धक्कादायक ! कोरोनाच्या भीतीने संपूर्ण कुटुंबाची आत्महत्या

Sucide
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – आंध्र प्रदेशमध्ये मन सुन्न करणारी घटना घडली आहे. कोरोना व्हायरसच्या भीतीने संपूर्ण कुटुंबाने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, कर्नुल शहरातील वड्डगेरी भागात एक कुटुंब राहत होते. कोरोनाच्या भीतीने चार जणांनी विष घेऊन आत्महत्या केली आहे, सुसाईड नोटमध्ये त्यांनी याबाबत उल्लेख केला होता. प्रताप (42), हेमलता (36), जयंत (17) आणि रिशिता (14) अशी आत्महत्या केलेल्यांची नावे आहेत. यामध्ये प्रताप हे टीव्ही मेकॅनिक होते. तर जयंत एक कोर्स करत होता आणि रिशिता इयत्ता सातवीमध्ये शिकत होती.

मिळालेल्या माहितीनुसार, प्रताप यांच्या कुटुंबातील कोणीही सदस्य बुधवारी सकाळी घराबाहेर दिसला नाही. तसेच घराचा दरवाजाही उघडला नाही. त्यामुळे शेजारच्यांना संशय आला. त्यांनी दार वाजवल्यानंतरही काही प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे अखेर पोलिसांना बोलवण्यात आले.पोलिसांनी दरवाजा तोडून घरात प्रवेश केला. त्यावेळी त्यांना चौघांचे मृतदेह आढळून आले. तसेच घटनास्थळाव पोलिसांना एक सुसाईड नोट सापडली आहे. यामध्ये त्यांनी आत्महत्येचे कारण कोरोनाची भीती असल्याचे म्हटले आहे.

सुसाईड नोटमधून झाला धक्कादायक खुलासा
कुटुंबाने सुसाईड नोटमध्ये त्यांच्या मित्राचा आणि नातेवाईकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला होता. त्यामुळे त्यांनाही कोरोनाची भीती सतावत होती असे म्हटले आहे. याच भीतीमधून या संपूर्ण कुटुंबाने टोकाचं पाऊल उचलत आत्महत्या केली आहे. पोलिसांकडून या घटनेचा अधिक तपास करण्यात येत आहे.