राज्यातील कोरोनाग्रस्तांची संख्या ९३१८ वर, २४ तासांत ७२९ नवे रुग्ण

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मुंबई | राज्यात आज दिवसभरात कोरोनाचे नवे ७२९ रुग्ण सापडले आहेत. यामुळे राज्यातील एकुण कोरोनाबाधितांची संख्या ९३१८ वर पोहोचली आहे. यामध्ये सर्वाधित रुग्ण मुंबई मध्ये सापडले आहेत. यापैकी 1388 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन दवाखान्यातून घरी पाठविण्यात आले आहेत अशी माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे.

मंगळवारी दिवसभरात करोना बाधित ७२९ नवीन रुग्णांची नोंद झाली असून, यामुळे राज्यातील एकूण रुग्णांचा आकडा ९ हजार ३१८ इतका झाला आहे. गेल्या २४ तासात करोना बाधित ३१ रुग्णांचा मृत्यू झाला असून, त्यात मुंबईतील २५ रुग्णांचा समावेश आहे. जळगावमध्ये चार तर पुणे शहरातील दोन रुग्ण दगावले आहेत. यामुळे राज्यातील करोना मृत्यूची संख्या ४०० इतकी झाली आहे.

मुंबईतील करोना बाधित रुग्णांची संख्या ६ हजार १६९ इतकी झाली असून, मुंबईतील करोना बाधित रुग्णांची एकूण संख्या २४४ इतकी झाली आहे. आज दिवसभरात १०६ जणांना बरे झाल्यानंतर घरी सोडण्यात आले. आज मृत्यू झालेल्या ३१ जणांपैकी १६ पुरूष तर १५ महिला रुग्ण आहेत. पुण्यातील करोना बाधित रुग्णांची संख्या १ हजार ०४४ झाली असून, पुण्यातील करोना बळींची एकूण संख्या ७६ इतकी असल्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी रात्री उशिरा सांगितले.

Leave a Comment