राज्यातील कोरोनाग्रस्तांची संख्या १७६१ वर, पहा जिल्हावार रुग्णसंख्या एका क्लिलवर

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मुंबई | राज्यातील कोरोनाग्रस्तांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. आज दिवसभरात एकुण १८७ नवे रुग्ण सापडले असून आता राज्यातील एकुण रुग्णांची संख्या १७६१ वर पोहोचली आहे.

मागील २४ तासात मुंबईत १३८ नवे रुग्ण सापडले आहेत. यर पुण्यात १० नव्या रुग्णांची भर पडली आहे. मालेगाव सुद्धा कोरोनाचे हाॅटस्पाॅट बनले असून मालेगावात आज नवीन ६ रुग्ण सापडले आहेत. याबरोबर अहमदनगर १, औरंगाबाद २, कोल्हापुर १, नाशिक १, नवी मुंबई ४, पालघर १, पनवेल १, ठाणे १, ठाणे ग्रामिण ३ अशी आज सापडलेल्या रुग्णांची जिल्हानिहाय यादी आहे.

दरम्यान, राज्यातील आत्तापर्यंत १२७ जणांना कोरोनामुळे आपला प्राण गमवावा लागपा आहे. यामध्ये मुंबईत सर्वाधिक म्हणजे ७६ जणांचा मृत्यू झाला आहे. त्याखालोखाल पुण्यात २७ जणांचा मृत्यू झाल्याची नोंद आहे.

कोरोनारुग्णांची जिल्हानिहाय यादी पाहण्यासाठी खालील ट्विट पहावे

 

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “HelloNews”

या बातम्याही वाचा –