राज्यात कोरोनाच्या रुग्णांचा आकडा 4200, रविवारी नवीन 552 रुग्णांची वाढ

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मुंबई | राज्यात रविवारी आणखी 552 नवीन करोनाबाधित रुग्णांची नोंद झाली. यामुळे एकूण रुग्ण संख्या 4200 झाली आहे. तर, आतापर्यंत 507 हून अधिक रुग्ण करोनामुक्त झाले आहेत. तर, मृतांची संख्या 287 झाली आहे. अशी माहिती आरोग्य विभागकडून देण्यात आली आहे.

सध्या देशात करोनाच्या रूग्णांच्या संख्येत वाढ झाली आहे. सरकारकडूनही करोनाला रोखण्यासाठी योग्य त्या उपाययोजना करण्यात येत आहेत. दरम्यान, नागरिकांनी घाबरून न जाता सतर्क राहण्याचं आवाहन सरकारकडून करण्यात आलं आहे.

तसेच राज्यात रुग्णाच्या संख्येत दिवसेंदिवस घट होत चालली होती. मात्र रविवारी अचानक नवीन 552 रुग्णांची नोंद झाली आहे. त्यामुळे सरकारच टेंशन आणखी वाढलं आहे. त्यामुळे राज्याच्या दृष्टीने ही अतिशय भीती निर्माण करणारी बातमी ठरली आहे.

राज्यात कोरोनाचे संकट आणखी गडद झाले आहे. सरकारने राज्यात लॉक डाऊन आणखी वाढवला असला तरी सोमवारपासून काही अत्यावश्यक सेवा सुरू केल्या आहेत. नागरीक घराबाहेर पडत असल्याने रुग्णांच्या संख्येत आणखी वाढ होत आहे.