सलमान, आमिर, जॅकी, अनिल यांच्यासह चित्रपट निर्माते सुभाष घई यांनी शेअर केले एक थ्रोबॅक पिक्चर

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । असे म्हणतात की ‘ओल्ड इज गोल्ड’,या म्हणीला प्रत्यक्षात उतरविले आहे चित्रपट निर्माता सुभाष घई यांनी.सोमवारी सकाळी सुभाष घई यांनी ९० च्या दशकातील सुपरस्टार्स सोबतचा आपला एक थ्रोबॅक फोटो शेअर केला. याफोटोमध्ये सुभाष घई यांच्याबरोबर सुपरस्टार सलमान खान, आमिर खान, गोविंदा, जॅकी श्रॉफ, अनिल कपूर आणि सचिन हे दिसत आहेत.या फोटोमध्ये बेबी सोनम आणि लहान टायगर श्रॉफसुद्धा दिसत आहेत.

 

हा फोटो शेअर करताना सुभाष घई यांनी लिहिले आहे – जातीय सलोख्यावरील ‘प्यार की गंगा बहे १९९१’ नावाच्या माझ्या शॉर्ट फिल्मच्या शूटिंग दरम्यान ‘९० च्या दशकाचे सुपरस्टार्स एकत्र. टायगर आणि सोनम अनुक्रमे जॅकी श्रॉफ आणि अनिल कपूरच्या मांडीवर. “याफोटोमध्ये दिसणारे सर्व स्टार्स यांनाही सुभाष घई यांनी टॅग केले आहेत,या फोटोला लोकांकडून चांगलीच पसंती मिळत आहे.आपले जुने सुपरस्टार्स एकाच फ्रेममध्ये एकत्रित पाहून चाहतेही खूप आनंदित झाले आहेत आणि चांगल्या कमेंटही देत आहेत.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.

 

You might also like