मुंबई । मुंबईतील टी- सीरिज कंपनीच्या इमारतीला तातडीने सील करण्यात आलं आहे. इमारतीचा केअर टेकर कोरोना पॉझिटिव्ह असल्याचं समोर आलं होतं. यानंतर पूर्ण परिसरच सील करण्यात आला. मुबईतील अंधेरी पश्चिममधील लिंक रोड येथे सिनेसृष्टीतील आघाडीची म्युझिक आणि सिनेप्रोडक्शन कंपनी असलेल्या टी-सीरिज कंपनीचे ऑफिस आहे. इमारत सील करण्यात आली आहे. या इमारतीत काम करणाऱ्या एका केअर टेकरची कोरोना टेस्ट केली असता ती पॉझिटिव्ह निघाली यानंतर शनिवारी दुपारी टी-सीरिजची इमारत आणि त्याच्या आसपासचा पूर्ण परिसर सील करण्यात आला आहे.
टी-सीरिज कंपनीच्या प्रवक्त्याने वृत्तपत्राला अधिक माहिती देताना सांगितलं की, ‘अंधेरीतील ऑफिस येथे काम करणारा एक कर्मचारी तिथेच काम करायचा आणि तेथेच तो रहातही होता. पण आता तो कोरोना पॉझिटिव्ह असल्याचं कळलं. म्हणून पूर्ण इमारत सील करण्यात आली आहे. इमारत सील केल्यानं तिथे राहणाऱ्यांपैकी अनेक आता त्यांच्या घरी जाऊ शकत नाही. त्यामुळं इमारतीतच त्यांच्या राहण्याची आणि जेवणाची सोय करण्यात आली आहे. इमारतीत अजून दोन ते तीन कर्मचारी काम करायचे. त्यांचीही चाचणी करण्यात आली असून त्यांचा टेस्ट रिपोर्ट येणे बाकी आहे. सुरक्षेच्या कारणांसाठी पूर्ण टी- सीरिज ऑफिस बंद करण्यात आले आहे. १५ मार्चपासूनच कर्मचाऱ्यांसाठी हे ऑफिस बंद करण्यात आलं होतं. जे काम करत आहेत ते सर्व कर्मचारी वर्क फ्रॉम होम करत आहेत.’
गेल्या महिन्यात टी- सीरिज ऑफिसची समोरची इमारतही सील करण्यात आली होती. या इमारतीतील ए विंगमध्ये राहणाऱ्या ११ वर्षाच्या मुलीला कोरोनाची लागण झाली होती. या दोन्ही इमारती समोरा समोर आहेत. याशिवाय टी-सीरिजच्या समोरच्या इमारतीत विकी कौशल, चित्रांगदा सिंह, चाहत खन्ना, अहमद खान, सपना मुखर्जी, राजकुमार राव- पत्रलेखा, राहुल देव, मुग्धा गोडसे, कृष्णा अभिषेक, कश्मीरा शाह, नील नितिन मुकेश, आनंद एल. राय, अर्जन बाजवा, विपुल शाह आणि प्रभुदेवा यांचे फ्लॅट आहेत.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”