बारावीची पुस्तकं आता बालभारतीच्या वेबसाईटवर; शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी सरकारचा निर्णय

0
75
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मुंबई । राज्यात लॉकडाउनमुळे सर्व शाळा महाविद्यालय बंद आहेत. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लॉकडाउन लागू करण्यात आला आहे. दरम्यान, लॉकडाउनच्या कालावधीत बारावीच्या विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून राज्याच्या शालेय शिक्षण विभागानं महतवाची घोषणा केली आहे. बारावी अभ्यासक्रमाचे सर्व शैक्षणिक साहित्य ‘पीडीएफ’ स्वरुपात बालभारतीच्या या संकेतस्थळावर ऑनलाईन उपलब्ध करुन देण्यात आले आहे. हे साहित्य विद्यार्थ्यांना डाऊनलोड करता येणार असून विद्यार्थी घरबसल्या अभ्यास करू शकतील.

राज्याच्या शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी बारावीच्या विद्यार्थांचे शैक्षणिक नुकसान हाऊ नये सदर निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळं बारावी अभ्यासक्रमाचे साहित्य ऑनलाइन विद्यार्थ्यांना उपलब्ध झालं आहे. त्यानुसार अभ्यासक्रमाची पुस्तके संकेतस्थळावर डाऊनलोड करण्याची सोय केली आहे. तसेच रेडिओ, दूरचित्रवाणीच्या माध्यमातूनही अभ्यास साहित्य देण्याबाबतची पडताळणी करण्यात येत आहे. विद्यार्थ्यांना http://www.ebalbharati.in/ या संकेतस्थळावरून पुस्तके डाऊनलोड करून घेता येतील.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “HelloNews”

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here