ट्रेनमध्येच उभारणार रुग्णालय; मोदी सरकारची योजना

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । येत्या काही दिवसात रोनाचा प्रादुर्भाव देशातील ग्रामीण भागाला झाल्यास मोठी जीवितहानी होण्याची शक्यता आहे. ही बाब लक्षात घेऊन खबदारीचा उपाय म्हणून मोदी सरकारनं रेल्वेतच वैद्यकीय सुविधां पुरवण्याच्या योजनेला मंजुरी दिली आहे. प्रसार माध्यमांच्या वृत्तानुसार, रेल्वेच्या बोगींना आयसीयू, क्वारंटिन वार्ड आणि आयसोलेशन सेंटरमध्ये बदलण्याचे आदेश पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रेल्वे मंत्रालयाला दिले आहेत. जेणेकरून आपत्कालीन परिस्थितीत ग्रामीण भांगामध्ये स्वास्थ्य सेवा वेळेवर पोहोचवता येईल.

जगातील परिस्थिती आणि भारतात करोनाचा वाढता प्रदुर्भाव पाहाता गेल्या काही दिवसांपासून सराकारने यावरील उपाय योजानांची तयारी सुरू केली आहे. मोदींनी २४ मार्च मंगळवारी देशात लॉकडाउनची घोषणा केली. त्यानंतर सर्व रेल्वे सेवांना १४ एप्रिल पर्यंत रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला. प्रसारमाध्यमांच्या वृत्तानुसार, केरळमधील कोच्ची येथे असणाऱ्या फार्मने पंतप्रधान कार्यालायाला या योजनेसाठीचा प्रस्ताव पाठवला.

रेल्वेच्या बोगींना रूग्णालयासारखं डिझायन करू शकतो, असा दावा कोच्ची येथील फर्मने केला आहे. फर्मने पंतप्रधान कार्यालायांना पाठवलेल्या पत्रात म्हटलेय, की, ‘आमच्याकडे १२,१६७ रेल्वे आहेत.त्यामध्ये २० ते ३० बोगी आहेत. आम्ही त्या सर्वांना मोबाइल हॉस्पिटलमध्ये बदलू शकतो. त्यामध्ये सर्व मेडिकल सुविधांसह आयसीयू, क्वारंटिन वार्ड आणि आयसोलेशन सेंटर उपलबद्ध करून देऊ शकतो. एका बोगींमध्ये १००० बेडची व्यवस्था करू शकतो.’

मंगळवारी या योजनेला केंद्र सरकारकडून मंजूरी देण्यात आली. पण गेल्या आठवड्यात झालेल्या बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रेल्वे मंत्रालयाला तयार राहण्याच्या सुचना दिल्याचं वृत्त द प्रिंट या वेबसाइटने सुत्रांच्या हवाल्याने दिले आहे. भारतामध्ये रेल्वेचे जाळे सर्वदूर असून भविष्यात बिकट परिस्थिती निर्माण झाल्यास ग्रामीण भागांतील रूग्णांसाठी याचा फायदा जास्त होईल. ग्रामीण भागांमध्ये करोना महामारी पसरल्यास रेल्वेच्या बोगीचा रुग्णालयासारखा वापर करण्यात येणार आहे.

दिवसभरातील बातम्या तुमच्या मोबाईलवर मिळवण्यासाठी 8080944419 या नंबरवर ”Hello News” टाईप करून त्वरित Whatsapp करा.