वॉशिंग्टन । अमेरिका जागतिक आरोग्य संघटनेतून (World Health Organization) बाहेर पडलं असून, ट्रम्प सरकारने (American Government) अधिकृत पत्र पाठविले आहे. अमेरिका आता यापुढे जागतिक आरोग्य संघटनेचा सदस्य नाही. डोनाल्ड ट्रम्प यांच्या सरकारने WHOला या संदर्भात आपला निर्णय अधिकृत पत्राद्वारे कळविला आहे.
अमेरिकन माध्यमांच्या म्हणण्यानुसार ट्रम्प सरकारने WHOमधून आपले सदस्यत्व मागे घेण्याबाबत एक पत्र पाठवले आहे. ६ जुलै २०२१ नंतर अमेरिका WHO चा सदस्य असणार नाही. १९८४ मध्ये ठरविलेल्या नियमांनुसार, कोणतेही सदस्यत्व मागे घेतल्याच्या १ वर्षानंतर, WHO मधून तो देश बाहेर पडू शकतो. त्यामुळे अमेरिकेचे सदस्य आता १ वर्षानंतर संपुष्टात येणार आहे. या व्यतिरिक्त अमेरिकेला WHOचे सर्व थकबाकी परतफेड करावी लागणार आहे.अमेरिकन सिनेटचा सदस्य रॉबर्ट मेनेंडेज यांनी ट्विट करुन अधिकृत दुजोरा दिला आहे. WHOपासून विभक्त होण्याबाबत अमेरिकेकडून माहिती मिळाली आहे. ट्रम्प सरकारच्या निर्णयामुळे अमेरिका आजारी आणि एकाकी होईल, असे ते म्हणाले.
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी एप्रिल महिन्यातच जागतिक आरोग्य संघटनेपासून विभक्त होण्याची घोषणा केली होती. WHOला देण्यात येणाऱ्या अनुदानाची रक्कम रोखण्याची तातडीने अंमलबजावणी केली गेली. अमेरिकेचा आरोप आहे की WHOने चीनमधील कोरोना विषाणूची ओळख जाणूनबुजून साथीचा रोग जाहीर करण्यात उशीर केला. त्याचवेळी, WHOने चीनी सरकारच्या आदेशानुसार काम सुरू केले आहे.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”