औरंगाबाद : महापालिकेने आपला स्वहिस्सा म्हणून 70 कोटी रुपयांची तरतूद स्मार्ट सिटीसाठी केली आहे. शहरात स्मार्ट सिटी अभियानातून विकास कामे होत असून जुलै महिन्यात ही रक्कम खर्च केली जाणार आहे. महापालिकेचे प्रशासक आणि आयुक्त आस्तिककुमार पांडेय यांनी बुधवारी याविषयी माहिती दिली.
केंद्र सरकारच्या महत्वाशी स्मार्ट सिटी अभियानात औरंगाबाद शहराचा 2016 मध्ये समावेश करण्यात आला होता. पाच वर्षात एक हजार कोटी रुपये करून वेगवेगळे कामे करण्याचा केंद्र शासनाचा मानस होता. तर महापालिकेचा 250 कोटी रुपयांचा हिस्सा होता. केंद्र शासनाकडून 294 कोटी रुपय मिळाले त्यानुसार केंद्र शासनाकडून 500 कोटी राज्य शासन 250 कोटी त्यापैकी 252 कोटी रुपय खर्च करण्यात आले. राज्य शासनाकडून 147 कोटी रुपये मिळाले, तयापैकी 93 कोटी रुपये खर्च करण्यात आले. सरकारकडून मिळालेल्या 431 पैकी 346 कोटी रुपये आता पर्यंत खर्च करण्यात आले आहेत. तर 750 कोटी रुपयांच्या खर्चाचे औरंगाबाद स्मार्ट सिटी डेव्हल्पमेंट कार्पोरशने नियोजन केले आहे.
महापालिकेने आतापर्यंत स्वहिस्सा टाकलेला नव्हता. मात्र, स्मार्ट सिटी बोर्डाचे मुख्याधिकारी व राज्याचे प्रमुख सचिव यांनी कुणाल कुमार यांनी काही महिन्यापूर्वी महापालिकेला स्वहिस्सा टाका, नाही तर पुढील निधी मिळणार नाही असे स्पष्ट केले होते. या संदर्भात माहिती देताना, प्रशासक पांडेय म्हणाले – महापालिकेने आर्थिक योजना करून 70 कोटी रुपयांची तरतूद केली आहे. ही रक्कम जुलै महिन्यात भरण्यात येईल तशेच मार्च महिन्यात अजून 3 कोटी पाहिजे. म्हणजेच 100 कोटी पर्यंत ही रक्कम नेली जाईल असेही त्यांनी सांगितले. त्या दरम्यान, महापालिकेचे प्रशासक आणि आस्तिककुमार पांडेय यांनी दिल्ली दौऱ्यावर असताना कुणाल कुमार यांची भेट घेऊन महापालिकेची आर्थिक स्थिती चांगली नसल्याची कल्पना दिली.