औरंगाबाद | कोरोना महामारीमुळे सर्व दुकानदारांना दिलेल्या वेळेत दुकाने सुरू ठेवण्याचे सांगण्यात आले आहे.त्याच बरोबर कोरोनाच्या नियमांचे पालन न करणाऱ्यांवर कारवाईही करण्यात येत आहे.तरी देखील अनेक दुकानदार सर्रास नियम मोडत आहे अशाच सात दुकांदारावर मनपाने कारवाईचा बडगा उगारला आहे.
औरंगाबादेत कोरोना काळात ठरवून दिलेल्या नियमांचे पालन न केल्यामुळे दुकानदारांवर महानगरपालिकेच्या नागरी मित्र पथकाकडून कारवाई सुरू आहे.या पथकाने शनिवारी सात दुकानदारांसह एका पेट्रोल पंपावर कडक कारवाई करण्यात आली. त्याचबरोबर प्रत्येकाकडून दहा ते वीस हजार रुपये दंड वसूल करण्यात आला. चिकलठाणा येथील मँकडोनाल्ड्स या हॉटेलचा कचरा रस्त्यावर आढळून आल्यामुळे त्या हॉटेलला 5 हजार रुपयांचा दंड लावण्यात आला. त्याचबरोबर नागरी मित्र पथकाकडून बीड बायपास रोड येथील अग्रवाल हार्डवेअरच्या दुकानदाराकडून 20 हजार रुपये दंड वसूल करण्यात आला.
स्मार्ट पॉईंटरकडून देखील कोरोना नियमांचे पालन न केल्याबद्दल 10 हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात करण्यात आला आहे. या सोबतच बीड बाय पास वरील इंडियन ऑइल पेट्रोल पंपाच्या मालकावर 10 हजार रुपयांच्या दंडाची कारवाई करण्यात आली. या पुढे ही कारवाई सुरूच राहणार असल्याची माहिती मनपा प्रशासनाकडून देण्यात आली.