हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | ” काय बसस्टॅंड…. काय एसटी….काय स्वच्छता.. सगळीकडेच घाण ” अशी गत ST महामंडळाची आहे. पण या स्थितीत सुधारणा करण्याचा विडा राज्य सरकारने उचल्याचे दिसत आहे. राज्य सरकारने गेल्या काही दिवसांपासून एसटीबाबत अनेक निर्णय घेतले आहेत. त्यानंतर आता एसटी महामंडळाने बसच्या स्वच्छतेबाबतही आणखी एक पाऊल पुढे टाकलं आहे. राज्यातील बस स्थानके स्वच्छ व सुंदर करण्यासाठी मोहीम सुरू करण्याचा निर्णय एसटी महामंडळाने घेतला आहे. तसेच अस्वच्छता दिसल्यास आगार व्यवस्थापकांना आर्थिक दंड बसणार आहे.
एसटी महामंडळाने घेतलेल्या निर्णया अंतर्गत १ ऑक्टोबरपासून एसटी गाड्यांची ही तपासणी मोहीम हाती घेण्यात येणार आहे. एसटी अस्वच्छ आढळून असल्यास त्याची जबाबदारी पूर्णपणे आगार व्यवस्थापकांवर निश्चित करून प्रतिबस पाचशे रुपये दंड ठोठावण्याचा निर्णय महामंडळाने घेतला आहे. या निर्णयामुळे आगार व्यवस्थापकांचे धाबे नक्की दणानणार एवढे नक्की कारण आजपर्यंत राज्यातील बसेसच्या स्वच्छतेकडे मोठ्या प्रमाणात दुर्लक्ष करण्यात आलेले आहे. आणि त्याचा फटका देखील एसटी महामंडळाला आर्थिक स्वरूपात बसत आलेला आहे. महामंडळाचे प्रवासी संख्या अश्या कारनामुळे दिवसेंदिवस कमी होत गेली.
सध्या हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे स्वच्छ, सुंदर बसस्थानक मोहीम सुरू आहे. परंतु एसटी महामंडळाने अनेक बैठकीत सांगून सुद्धा एसटी मधील स्वच्छता काही सुधारण्याचे नाव घेत नसल्याने महामंडळाने थेट निर्णय घेत आगार व्यवस्थापकांना एसटी स्वच्छतेसाठी जवाबदार करण्याचे ठरवले आहे. त्याअंतर्गत महामंडळाने 60 वरिष्ठ अधिकाऱ्यांचे पथक तयार केले आहे. जे की वेळोवेळी एसटी बसेस तपासणी करून बसेस अस्वच्छ आढळून आल्यास आगार व्यवस्थापकाला जवाबदार धरून प्रत्येकी बसेससाठी 500 रुपये दंड ठोठावण्यात येईल. पथकाने महिन्यातून किमान 15 बसेस तपासणी करून तपासणीची माहिती आगार व्यवस्थापकांनी राज्यातील सर्व विभागप्रमुखांना देण्याच्या सूचना मुख्यालयाने केल्या आहेत.
पथकाद्वारे आगारातील बसेसचे गुणांकन केले जाईल. त्यासाठी खालील बाबींची तपासणी करून बसेसला स्वच्छतेबाबत गुण दिले जातील.
बसच्या आतील केरकचरा साफ करणे.
बस आतून व बाहेरून धुऊन व पुसून स्वच्छ करणे.
बसमधील पडदे स्वच्छ ठेवणे .
बसवरील पाटीवर ज्याठिकाणचे नाव आहे हे ते सुस्पष्ट असणे.
बसवरील अनधिकृत पोस्टर काढणे