लोकांनी आक्का म्हणून बसवलं, तुम्ही बुक्का लावायच्या भानंगडीत पडू नका; नगराध्यांक्षा माधवी कदम यांना नगरसेविका सिध्दी पवार यांचा सल्ला

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके

महिलादिनी सातारा नगरपरिषदेच्या नगराध्यक्षा माधवी कदम यांनी माझ्यावर आरोप केला बांधकाम सभापतींना सह्याचे अधिकार नाहीत, त्यांना काही माहिती जबाबदारी. विकासकामांना खिळ घालणे म्हणजे सह्याचे अधिकार असतील तर नशीब आहे आमचे सह्याचे अधिकार नाहीत. सह्याचे अधिकार दाखवणारे तुम्ही आमच्या जबाबदारीची जाणीव देता. तुम्हांला लोकांनी आक्का म्हणून बसवलं तुम्ही साताराकरांना बुक्का लावायच्या भानंगडीत पडू नका असा सल्ला नगरसेविका सिध्दी पवार यांनी नगराध्यांक्षा माधवी कदम यांना पत्रकार परिषदेत दिला.

नगसेविका सिध्दी पवार म्हणाल्या, नगराध्यांक्षा विचार करून ठरावावर सह्या करत असतील तर 3 फेबु्रवारी 2021 झालेल्या सभेत ठराव मंजूर आहेत. 24 फेबु्रवारीला ऑनलाईन जमा झाले. मग आज 9 मार्चपर्यंत ते ठराव कुठल्या त्रुटीसाठी आडवलेले आहेत. एकदा जिल्हाधिकारी कार्यालयात ठराव जमा झाल्यानंतर त्यामध्ये कोणताही बदल करता येत नाही. केवळ टक्केवारी सगळ्या गोष्टी आमच्यापर्यंत पोहचत आहेत. सातारा शहराचे नांव आजपर्यंत कधी नाही इतके नांव बदनाम तुमच्या काळात झाले. आपण कॅप्टन कूल बनून जनतेवर झूल टाकली. आमचे विकास कामे घरची कामे नव्हे जनतेच्या कामे साताराच्या हद्दीतील लोकांना सुविधा मिळायला नको. सह्याचे अधिकार दाखवणारे तुम्ही तुमच्या जबाबदारीची जाणीव देता. तुम्हांला लोकांनी आक्का म्हणून बसवलं तुम्ही साताराकरांना बुक्का लावायच्या भानंगडीत पडू नका. आम्ही लय तयारीच आहोत. अस कुणी बुका लावून घेत नाही. शेत कसं कुंपन खातं हे आम्हांला चागलंच माहीती आहे. माझ्या नरड्याशी येसालं तर कोथळा बाहेर काढण्यार्‍यांची लेक आहे.

लोकांनी आक्का म्हणून बसवलं, तुम्ही बुक्का लावायच्या भानंगडीत पडू नका - Sidhhi Pawar |  Madhavi Kadam

पुढे सिध्दी पवार म्हणाल्या, मी साताराची लेक आहे, सातारकरांसाठीच भाडणार, तुम्हांला काय वाटतं मी गप्प बसावं. तुमचा भ्रष्ट कारभार चव्हाट्यावर मांडणार, तुम्ही कोणावर आरोप करता आहात. मी सह्या करताना विचार करते. मी तुमच्यासारखं आयतं येवून बसलेली नाही. कित्येक वर्ष समाजकार्य करत आहे. शौचालय उपलब्ध का नाही केले. बाजारपेठ का नाही दिली. सह्याचे अधिकार कुणाला सांगता, सह्याचे अधिकार आणि जबाबदारीची जाणीव असती तेव्हाच तुम्ही धुमाळ घरी बसला आणि नगरपालिकेला भ्रष्टाचाराच गालबोट आमच्या नगरपालिकेला लागलं. त्यावेळी आम्ही कोेव्हीड आहे, म्हणून गप्प बसलो. बसून बसून कुरघोड्या करून आघाडीत बिघाडी करणार असाल जनतेची दिशाभूल करत असाल तर राजीनामा मागणार.एक महिला अध्यक्ष म्हणजे मातृत्वाच्या भावनेने विकास व्हायला पाहिजे मात्र येथे तुम्ही किती देता आणि आम्ही किती घेता.

सातारा जिल्ह्यासह राज्यातील सर्व महत्वाच्या ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप Join करा

Click Here to Join Our WhatsApp Group

Leave a Comment