सातारा | महाबळेश्वर येथील तहसिल कायार्लयातील लाचखोरीत सापडलेल्या अव्वल कारकूनाला सातारा येथील न्यायालयाने चार वर्षांची शिक्षा ठोठावली आहे. महाबळेश्वर येथील अव्वल कारकुन अमोर अशोक सलागरे हा निवडणूक काळातील वाहनांची बीले काढण्यासाठी 15 हजारांची लाच स्विकारताना 2017 साली लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या सापळयात अडकला होता. त्याची सुनावणी सातारा येथील न्यायालयात झाली.
या प्रकरणात न्यायाधिश एन. एल. मोरे यांनी अमोल सलागरे याला दोषी ठरवुन 4 वर्षे सक्तमजुरी व 5 हजार रूपये दंड, दंड न भरल्यास 2 महीने सक्तमजुरी अशी शिक्षा सुनावली. न्यायालयाच्या या निर्णयामुळे लाचखोरीत सापडल्यानंतर ही अजिबात लाच न बाळगणाऱ्या सरकारी कर्मचाऱ्यांना काही प्रमाणात तरी वचक बसेल अशी अपेक्षा आहे.
जिल्हा परीषद व पंचायत समितीच्या सावर्त्रिक निवडणुकीत अधिग्रहण वाहनांची बिले काढण्यासाठी तहसिल कायार्लयातील अव्वल कारकुन अमोल आशोक सलागरे याने वाहनधारकांकडे प्रत्यक वाहनामागे 300 रूपये या प्रमाणे पंधरा हजार रूपयांच्या लाचेची मागणी केली होती. या संदर्भात वाहनधारकांनी सातारा येथील लाचलुचपत विभागाकडे 29 मार्च 2017 रोजी तक्रार दाखल केली होती.
तक्रारीनुसार लाचलुचपत विभागाने 30 मार्च रोजी सापळा रचला व या सापळयात अमोल सलागरे हा रक्कम स्विकारताना अलगद सापडला. या खटल्याचा निकाल आज सातारा येथील विशेष न्यायालयाचे न्यायाधिश एन एल मोरे यांनी दिला लाचलुचपत प्रतिबंधक अधिनियम 1988 चे कलम 7 नुसार अमोल सलागरे यांना दोषी ठरवले. सरकार पक्षाच्या वतीने मंजुषा जयदिप तळवळकर यांनी काम पाहीले. न्यायालयीन कामकाजात सरकार पक्षाला अशोक शिर्के, सहायक फौजदार विजय काटवटे यांनी मदत केली.