Cotton Rate : कापसाच्या दरात विक्रमी वाढ, MCX वर कापूस 50,000 रुपयांच्या वर !!!

Cotton Rate
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Cotton Rate : जगभरात कापसाचे उत्पादन घसरण्याची भीती निर्माण झाल्याने यंदा कापसाचे भाव गगनाला भिडले आहेत. हे लक्षात घ्या कि, MCX वर कापसाचे भाव सातत्याने 50,000 रुपयांच्या वर आहेत. ऑगस्ट 2022 मध्ये कापसाच्या किंमतीत आतापर्यंत 14 टक्क्यांनी वाढ झाली आहे. यूएस डिपार्टमेंट ऑफ एग्रिकल्चर (USDA) ने यूएस कापूस उत्पादन 2022 चा अंदाज यावेळी 12.01 कोटी बेल्‍सवरून 11.70 कोटी बेल्‍सवर कमी केल्यानंतर जागतिक कापसाच्या किंमती आणखी वाढण्याची अपेक्षा आहे. Cotton Rate

Cotton: Today Latest News, Photos, Videos about Cotton - Zee Business

एका मीडिया रिपोर्टनुसार, अमेरिकेतील दुष्काळामुळे उत्पादनात घट होण्याची भीती वाढली आहे. यावेळी टेक्सासमध्ये फक्त 29 लाख बेल्‍स कापसाचे उत्पादन होणे अपेक्षित आहे. टेक्सासने 2021 मध्ये 7.7 कोटी बेल्‍स कापसाचे उत्पादन केले आहे. भारताबाबत सांगायचे झाल्यास देशातील कॅरी स्टॉकमध्येही घट झाली आहे. इतकेच नव्हे तर मान्सूनच्या असमतोलामुळे नवीन पिकांच्या उत्पादनात देखील घट होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. Cotton Rate

खुशखबरी: कॉटन में जबरदस्त तेजी, MCX पर कपास 50500 के पार, देखें ताजा रेट

गुलाबी बोंडअळीचा प्रभाव

गेल्या वेळेप्रमाणे यंदाही हरियाणा आणि पंजाबमध्ये कापूस पिकावर गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव दिसून येतो आहे. हरियाणातील अनेक जिल्ह्यांना याचा फटका बसला आहे. तर दुसरीकडे, महाराष्ट्र गुजरातमधील अतिवृष्टीमुळे कापूस पिकाचे नुकसान झाले आहे. त्याचबरोबर उत्तर भारतातील काही भागात कमी पाऊस झाल्याने यंदा कापूस पिकाची पेरणी कमी झाली आहे. यामुळे देशांतर्गत कापूस उत्पादनात घट होण्याची शक्यता असल्याने हे सर्व घटकही भाववाढीला साथ देत आहेत. Cotton Rate

Cotton prices set to come under pressure as demand weakens, economy slows - The Hindu BusinessLine

किंमती वाढतच आहे

कापसाच्या वाटचालीवर नजर टाकली तर एप्रिलमध्ये कापसात 6 टक्के, मे महिन्यात 8 टक्के, जूनमध्ये 4 टक्क्यांनी वाढ झाली होती. जुलैमध्ये कापूस 14 टक्क्यांनी घसरलेला असला तरी ऑगस्टमध्ये आतापर्यंत 14 टक्क्यांनी वधारला आहे. कापसाच्या या वाढणाऱ्या किंमतींमुळे उद्योगजगत त्रस्त झाले आहे. अशातच जास्त भाव असूनही सूतगिरणीला कापूस खरेदी करावा लागत आहे. कापसाच्या या वाढत्या किंमतीमुळे MCX मधून कापूस काढून टाकावा, अशी मागणी गिरणीमालकांकडून केली जात आहे. Cotton Rate

अधिक माहितीसाठी या वेबसाईटला भेट द्या : https://www.mcxindia.com/products/agro-commodities/cotton

हे पण वाचा :

Bank FD : आता ‘या’ बँकांनी देखील FD चे व्याजदर वाढवले, नवे दर तपासा

साक्री तालुक्यातील कावठे गावात श्रीमद् भागवत कथा सप्ताह

विद्यार्थ्यांच्या कानशिलात लगावल्याने शाळेच्या संस्थापिका, शिक्षिकेवर पोलिसात गुन्हा

Gold Price Today : जन्माष्टमीला सोने-चांदी झाले स्वस्त, आजचे ताजे दर पहा !!!

Realme 9i 5G : 5,000 mAh बॅटरी, 50 MP कॅमेरा..; Realme चा दमदार मोबाईल लॉन्च