हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Mental Trauma) कोरोना महामारीचे प्रमाण कमी झाल्याने लोकांनी आता कुठे मोकळा श्वास घ्यायला सुरुवात केली आहे. दरम्यान, इतर विषाणू आणि व्हायरसमूळे उदभवणाऱ्या समस्या सुरूच आहेत. अशातच एका धक्कादायक माहितीने सर्वत्र चिंतेचे वातावरण पसरण्याची शक्यता आहे. कोरोना कमी झाला असला तरी त्याचा मानवी जीवनावर पडलेला प्रभाव आहे तसाच आहे. गेल्या काही महिन्यांमध्ये लाँग कोविडच्या अनेक घटना समोर आल्या आहेत. कोरोनामुळे लोकांचे मानसिक आरोग्य खराब होत आहे. एका वृत्तानुसार, Sapien लॅबद्वारे प्रकाशित करण्यात आलेल्या २०२३ च्या ग्लोबल मेंटल स्टेट रिपोर्टमध्ये याबाबत सविस्तर माहिती देण्यात आली आहे.
काय लिहिलंय या रिपोर्टमध्ये?
काही तज्ञ मंडळींनी सादर केलेल्या या रिपोर्टमध्ये सांगण्यात आलं आहे की, लोकांना वाटलेलं कोरोना संपल्यानंतर लॉकडाऊन हटेल. त्यानंतर सगळं काही पाहिल्यासारच सुरळीत होईल. (Mental Trauma) पण तसे न होता या महामारीनंतर वरवर ठीक वाटणारं लोकांचं आरोग्य हळूहळू खराब होऊ लागलं आहे. विशेषतः लोकांच्या मानसिक आरोग्यावर याचा प्रभाव कायम राहिला आहे. यात असंही म्हटलंय की, एकूण ७१ देशांमधील ४ लाखांपेक्षा जास्त लोक मेंटल ट्रॉमामध्ये जगत आहेत. यामध्ये अनेक भारतीयांचा देखील समावेश आहे. जागतिक स्तरावर ही संख्या २७.१% इतकी आहे.
भारतातील इतके लोक मेंटल ट्रॉमाचे शिकार
या सर्वेक्षणात भारतातील ४६,९८२ लोक मानसिकरीत्या अस्वस्थ असल्याचे समजले आहे. अर्थात जगभरातील संख्येत ३०.४% लोक हे भारतीय आहेत. जे मानसिक दृष्ट्या अस्वस्थ आहेत. कोरोनानंतर ते खराब मानसिक आरोग्याशी (Mental Trauma) संघर्ष करत आहेत. या वृत्तानुसार, भारताच्या तुलनेत युनायटेड किंगडम, दक्षिण आफ्रिका, ब्राझील आणि ऑस्ट्रेलियामध्ये अधिक लोक खराब मानसिक आरोग्याशी सामना करत असल्याचे सांगितले आहे. तर सिंगापूर, फ्रान्स, कॅनडा, अमेरिका, इटली, श्रीलंका आणि इस्रायलमधील बऱ्याच लोकांचे मानसिक आरोग्य चांगले असल्याचे सांगण्यात आले आहे.
मेंटल ट्रॉमा होण्यामागील आणखी एक कारण (Mental Trauma)
तज्ञांनी सादर केलेल्या रिपोर्टमध्ये असेही सांगण्यात आले आहे की, कोरोना या महामारीमूळे जीवनमानावर मोठा परिणाम झाला आहे. कोरोनानंतर प्लॅस्टिकचा वाढता वापर देखील मासिक आजरांचे मुख्य कारण बनले आहे. एका फाउंडेशनच्या रिपोर्टनुसार, प्लॅस्टिकमध्ये आढळणाऱ्या Phthalates आणि इतर केमिकल्सचा माणसाच्या मानसिक आरोग्यावर परिणाम होतो. यामुळे माणूस नैराश्य, चिंता आणि स्किझोफ्रेनियासारख्या मानसिक आजारांचा शिकार होऊ शकतो.
कोणाला धोका?
मानसिक आरोग्यात बिघाड होण्यामागे अनेक कारण असू शकतात. ज्यामध्ये अगदी स्मार्टफोन आणि अल्ट्राप्रोसेस फूडयांचाही समावेश असू शकतो. (Mental Trauma) ज्याचा सर्वाधिक प्रभाव तरुण वयातील मुलांमध्ये आहे. दिवसातले सर्वाधिक तास स्मार्टफोन वापरणे आणि सकस आहाराला प्रोसेस्ड फूडसोबत रिप्लेस करणे या सवयींमुळे तरुण मंडळींमध्ये मानसिक आरोग्याच्या समस्या वाढत आहेत.
आपल्या देशात १८ ते २४ वय वर्षातील ५०.७% लोक मानसिक आरोग्याच्या समस्यांशी सामना करत आहेत. तर २५ ते ३४ वय वर्षातील ४२.९% लोकांना मानसिक आरोग्याच्या समस्या आहेत. तसेच ३५ ते ४४ वय वर्षातील २८.७%, ४५ ते ५४ वय वर्षातील १७.६% लोकांचे मानसिक आरोग्य अस्थिर आहे. दरम्यान, ५५ वय वर्षांपेक्षा जास्त वयाच्या लोकांमध्ये मात्र मानसिक आरोग्याच्या समस्यांचे प्रमाण कमी असल्याचे दिसून आले आहे. (Mental Trauma)