हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Visa : जर आपण परदेशात प्रवास करण्यासाठी स्वस्त ठिकाणांच्या शोधात असाल तर आज आपण अशा देशांची माहिती जाणून घेउयात जिथे अगदी स्वस्तात प्रवास करता येईल. याशिवाय आज अशा काही देशांची माहिती देखील जाणून घेणार आहोत जिथे भारतीय पर्यटकांना व्हिसाशिवाय प्रवेशही मिळतो.
बार्बाडोस
निसर्गाच्या कुशीत वसलेला बार्बाडोस हा एक अतिशय सुंदर देश आहे, जो प्रशांत महासागराच्या पश्चिमेकडील कॅरिबियन बेटावर वसलेला आहे. जर आपल्याकडे भारतीय पासपोर्ट असेल तर आपल्याला इथे व्हिसाशिवाय प्रवास करता येईल. बार्बाडोसच्या 1 डॉलरची किंमत सुमारे 41 रुपये आहे. Visa
मॉरिशस
मॉरिशसमध्ये व्हिसाशिवाय जास्तीत जास्त 90 दिवस राहता येते. इथल्या 1 मॉरिशियन रुपयाचे मूल्य भारताच्या 1.78 रुपये इतके आहे. Visa
मलेशिया
भारतातून मलेशियाला पोहोचायला फक्त 4 तासांचा प्रवास करावा लागतो. इथे अनेक पर्यटक येत असतात. क्वालालंपूर हे मलेशियाचे प्रमुख पर्यटन स्थळ आहे. ईथे जाण्यासाठी ई-व्हिसा आवश्यक आहे. आपल्या 1 रुपयाचे मूल्य इकडे 18.53 रुपये इतके आहे. Visa
भूतान
भारतीयांना भूतानमध्ये जाण्यासाठी व्हिसाची गरज नाही. इथे आपल्याला रोड, फ्लाइट आणि ट्रेनद्वारे जाता येते. भूतानच्या चलनाचे मूल्य भारतीय चलनाइतकेच आहे.
नेपाळ
नेपाळच्या सल्ल्यानुसार, भारतीयांना फक्त आपले भारतीय नागरिकत्व सिद्ध होईल अशाच कागदपत्रांची गरज असते. यासाठी ते मतदार ओळखपत्र किंवा आधार कार्ड दाखवू शकतात. जर आपण दिल्लीहून फ्लाइटने जात असाल तर आपल्याला 12 हजार ते 15 हजारांपर्यंत प्रवास खर्च येईल. तसेच नेपाळच्या 1 रुपयाचे मूल्य हे भारताच्या 0.63 रुपयांच्या बरोबरीचे आहे.
अधिक माहितीसाठी या वेबसाईटला भेट द्या : https://www.mea.gov.in/images/amb1/visa-facility-for-indian-nationals.pdf
हे पण वाचा :
Voter ID-आधार लिंकिंगसाठी सरकारकडून देण्यात आली मुदतवाढ
’31 मार्चपर्यंत बँकांना सुट्टी नाही, रविवारीही होणार कामकाज’ – RBI चा आदेश
Gold Price Today : गुढीपाडव्याच्या दिवशी सोन्या-चांदीच्या दरात घसरण, पहा आजचे नवे दर
देशातील Moto G32 बनला सर्वात स्वस्त फोन ! जाणून घ्या किंमत अन् फीचर्स
Investment : ‘या’ सरकारी योजनांमध्ये 31 मार्चपूर्वी गुंतवणूक करून मिळवा जोरदार रिटर्न