धक्कादायक ! बुलढाण्यात विहिरीत उडी घेऊन प्रेमीयुगुलाची आत्महत्या

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

बुलढाणा : हॅलो महाराष्ट्र – बुलढाण्यामध्ये एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. यामध्ये एका प्रेमीयुगुलाने विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली आहे. बुलढाणा जिल्ह्यातील गोशिंग शिवारात हि घटना घडली आहे. याप्रकरणी बोराखेडी पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन गावकऱ्यांच्या मदतीने दोघांचे मृतदेह विहिरीतून बाहेर काढले आणि शवविच्छेदनासाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात पाठवण्यात आले. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. या प्रेमीयुगुलाने नेमकी कोणत्या कारणामुळे आत्महत्या केली याचा तपास पोलिसांकडून करण्यात येत आहे.

काय आहे नेमके प्रकरण ?
नांदुरा तालुक्यातील तरोडा नाथ येथील अल्पवयीन मुलीचे आणि मोताळा तालुक्यातील गोशिंग येथील शेख अल्ताफ शेख शकील या 21 वर्षीय युवकाचे गेल्या काही दिवसांपासून एकमेकांवर प्रेम होते. घटनेच्या दिवशी हे दोघेही सकाळी 10 वाजण्याच्या दरम्यान घरून निघून गेले होते. मात्र संध्याकाळपर्यंत ते दोघेही घरी परत न आल्याने या दोघांच्या घरच्यांनी त्यांचा सर्वत्र शोध घेतला. मात्र त्यांचा कुठेच पत्ता लागला नाही.

यानंतर या दोघांच्या परिवारांनी आपली मुले हरवली असल्याची तक्रार दाखल केली. यानंतर दुसऱ्या दिवशी या दोघांचे मृतदेह गोशिंग शिवारात एका शेतातील विहिरीत आढळल्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.