हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | संचारबंदीच्या काळात वाढलेल्या चॅटिंगमुळे अनेक जोडप्यांचे संसार बिनसले आहेत. नागपूरमध्ये गेल्या सहा महिन्यात पोलिसांकडे याबाबत ६०० पेक्षा अधिक तक्रारी आल्या आहेत. यामध्ये एप्रिल, मे आणि जून महिन्यात सर्वाधिक तक्रारी आल्या आहेत. संचारबंदीमध्ये पती-पत्नी २४ तास घरात बंदिस्त झाले होते. बाहेर ये-जा बंद असल्याने सोशल मीडियावर पती-पत्नीचं इतरांशी चॅटिंग करण्याचं प्रमाण वाढलं आहे. पण यात अति चॅटिंगमुळे नागपुरात अनेक संसाराची सेटिंगच बिघडलेली आहे. अति चॅटिंगमुळे एप्रिल ते सप्टेंबर या सहा महिन्यात पती-पत्नीकडून ६०० पेक्षा जास्त तक्रारी नागपूर पोलिसांच्या ‘भरोसा सेल’कडे पोहोचल्या आहेत.
यातल्या काही केसेस घटस्फोटापर्यंतही पोहोचल्या आहेत. कोरोनाच्या काळात पती-पत्नीचे अनैतिक संबंधंही समोर आल्याच्या तक्रारी पोलिसांपर्यंत पोहोचल्या आहेत. संचारबंदीच्या काळात बाहेर जाणं बंद असल्याने मित्र मैत्रीणी किंवा सहकाऱ्यांच्या संपर्कासाठी सोशल मीडिया हेच प्रभावी साधन ठरलं. पण याच सोशल मीडियावर अती चॅटिंगमुळे अनेकांचे विवाहबाह्य संबंध समोर आलेत. याबाबतच्या तक्रारी पोलिसांपर्यंत पोहोचल्या आहेत.
सोशल मीडिया वर अती चॅटिंग सुखी संसारात विष कालवत असल्याची बाब लक्षात आली आहे. संचारबंदी मुळे चीनमध्येही अनेक पती-पत्नींच्या भांडणात वाढ झाली आहे आणि घटस्फोटाच्या प्रमाणातही मोठ्या संख्येने अर्ज करण्यात आले आहेत.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’