मुंबईतील नोकरी सोडून त्याने केली काळ्या तांदळाची शेती

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | एका २६ वर्षीय इंजिनिअर युवकाने सर्वाधिक महागड्या समजल्या जाणाऱ्या आणि खाण्यासाठी अत्यंत उपयुक्त असलेल्या काळ्या तांदळाची कोकणातील दापोली येथे शेती केली आहे. या तांदळाला औषध कंपन्यांकडून मोठी मागणी आहे. या तांदळामुळे कोकणातील भातशेतीचे अर्थकारण बदलून कोकणातील भातशेतीला एक नवा आर्थिक आयाम मिळेल अशी आशा वर्तवण्यात येत आहे. दापोली तालुक्यातील करंजाळी येथील अभिषेक सुर्वे असे या २६ वर्षीय युवकाचे नाव आहे. आपल्या शेतात त्याने काळ्या तांदळाची शेती केली आहे. अभिषेक हा करंजाळी येथील मूळ रहिवासी असला तरी तो मुंबई येथे अभियंता म्हणून नोकरीला होता. आता तो आपल्या नोकरीचा राजीनामा देऊन दापोलीत आला आहे.

अभिषेकने दापोलीत स्थायिक झाल्यावर आपली वडिलोपार्जित शेती करण्याचा निर्णय घेतला व आपल्या शेतीत वेगवेगळे प्रयोग करायला सुरुवात केली. तो मुंबईतील एका धान्य उत्पादन व वितरण व्हाट्सअॅप ग्रुपमध्ये सहभागी आहे. यामध्ये त्याला काळ्या तांदळाची माहिती मिळाली.

अभिषेकने दापोलीत स्थायिक झाल्यावर आपली वडिलोपार्जित शेती करण्याचा निर्णय घेतला व आपल्या शेतीत वेगवेगळे प्रयोग करायला सुरुवात केली. तो मुंबईतील एका धान्य उत्पादन व वितरण व्हाट्सअॅप ग्रुपमध्ये सहभागी आहे. यामध्ये त्याला काळ्या तांदळाची माहिती मिळाली.

काळ्या तांदळाला मोठ्या शहरात तसेच परदेशात मोठी मागणी आहे. मोठ्या शहरांमध्ये हा तांदूळ ४०० ते ५०० रुपये किलो दराने विकला जातो. फ्लिपकार्टसारख्या ऑनलाईन साईटवर या तांदळाची विक्री ३९९ रुपये प्रतिकिलो दराने सुरू आहे, अशी माहिती अभिषेकने दिली.

कोकणात उकडीचे तांदूळ, गावठी तांदूळ, बासमती, सुवर्णा, कोलम अशा अनेक प्रकारच्या तांदळाची शेती केली जाते. आता अभिषेकसारख्या प्रयोगशील शेतकऱ्याने काळ्या तांदळाची शेती करायला सुरुवात केली आहे. पांढऱ्या तांदळाच्या तुलनेमध्ये काळा तांदूळ (ब्लॅक राईस) हा शेतकऱ्यांना आर्थिकदृष्ट्या फारच फायदेशीर आहे. कार्बोहायड्रेटयुक्त असलेला हा तांदूळ शरीरातील साखर व हृदयरोग असलेल्या रुग्णांना खूप फायदेशीर आहे. असे अनेकजण सांगतात. हा तांदूळ खाल्यामुळे कोलेस्ट्रॉलचे प्रमाण नियंत्रणात येते. या तांदळात मोठ्या प्रमाणात फायबर आहे. सोबतच अँटी ऑक्सीडेंट तत्व असल्याने हा तांदूळ डोळ्यांसाठीदेखील उपयुक्त आहे. त्यामुळे भारतातच नव्हे तर विदेशातूनदेखील या तांदळाला मोठी मागणी असल्याचा दावा या शेतकऱ्याने केला आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’

You might also like