सांगली प्रतिनिधी । दारू आणण्यासाठी नकार देणार्या गणेश वाल्मिकी या मावस भाच्याला गळफास लावून खून केल्याप्रकरणी मामा गणेश हणमंतप्पा तळवार याला दोषी धरून जन्मठेप व एक हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावण्यात आली. जिल्हा व सत्र न्यायाधीश अण्णासाहेब पाटील यांनी आज हा निकाल दिला.
मृत गणेश हा त्याची आई ज्योती, हणमंत व लक्ष्मी यांच्यासोबत ख्वॉजा वसाहतमध्ये राहत होता. त्याचे वडील जयसिंगपूर येथे राहत होते. आरोपी तळवार हाही तिथेच राहत होता. त्यामुळे त्याचे गणेशच्या घरी येणे-जाणे होते. १५ जुलै २०१८ रोजी गणेशची आई ज्योती या जयसिंगपूर येथे कामानिमित्त गेल्या होत्या. त्याच दिवशी तळवार हा त्यांच्या घरी आला. त्याने गणेशला दारू विकत घेऊन येण्यास सांगितले. पण गणेशने दारू आणण्यास नकार दिला. त्यामुळे तळवारला प्रचंड राग आला. काही वेळानंतर त्याने गणेशची बहिण लक्ष्णीला बिडी आणण्यास सांगितले. ती बिडी घेऊन आली. त्यानंतर त्याने लक्ष्मीला चॉकलेट आणण्यास पाठवून दिले.
मात्र लक्ष्मी चॉकलेट घेऊन येईपर्यंत तळवारने गणेशला दोरीने बांबुच्या तुळईला गळफास लाऊन मारले. लक्ष्मी हि घटना समजताच तिने आरडाओरड करीत शेजार्यांकडे धाव घेतली. तिच्या हाकेने शेजारचे लोक पळत आले. त्यांनी गणेशचा मृतदेह पाहिला. त्यावेळी तळवार हा बिड्या ओढत बसला होता. हि घटना त्याला विचारत शेजार्यांनी तळवारला बेदम चोप दिला. त्यावेळी त्याने गणेशचा खून केल्याची कबूली दिली.