ऑगस्टच्या अखेरीस Covaxin ला मिळू शकते आंतरराष्ट्रीय मान्यता, WHO ची आज मोठी बैठक

0
67
covaxin
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नवी दिल्ली । भारत बायोटेकने तयार केलेल्या कोव्हॅक्सिनला आंतरराष्ट्रीय स्तरावर या महिन्याच्या अखेरीस म्हणजेच ऑगस्टपर्यंत मान्यता मिळू शकते. WHO चे शिष्टमंडळ आज आरोग्यमंत्र्यांना भेटणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या EUL मध्ये समाविष्ट होण्यासाठी ही लस फार पूर्वी लागू झाली होती. कॅनडामध्ये कोव्हॅक्सिनचे ‘पुनरावलोकन’ सुरू आहे.

भारत बायोटेकने गेल्या जुलैमध्ये कळवले होते की, कंपनीने आपत्कालीन वापराच्या लिस्टिंगमध्ये कोव्हॅक्सिनचा समावेश करण्यासाठी सर्व आवश्यक कागदपत्रे सादर केली आहेत. हैदराबादस्थित कंपनीने म्हटले होते की,” लसीची पुनरावलोकन प्रक्रिया सुरू झाली आहे आणि “कोव्हॅक्सिनला लवकरात लवकर WHO कडून EUL मिळण्याची शक्यता आहे.” खरं तर, EUL हे लायसन्स आहे, जे कंपनीला WHO कडून मिळवावे लागते त्यानंतर प्रभावित लोकांना लस उपलब्ध करून दिली जाऊ शकते.

कॅनडामध्ये पुनरावलोकन चालू आहे
मीडिया रिपोर्ट्समध्ये, भारत बायोटेकची अमेरिकन आणि कॅनेडियन उपकंपनी, ऑक्युजेनच्या हवाल्याने असे सांगितले जात आहे की, कॅनडामध्ये लसीचे पुनरावलोकन चालू आहे. कंपनीने शनिवारी ही माहिती दिली होती. ऑक्युजेन आणि भारत बायोटेक यांच्यात या वर्षी जूनमध्ये कॅनडामध्ये कोव्हॅक्सिन आणण्यासाठी करार करण्यात आला. ऑक्युजेनने कॅनडामध्ये लस विकण्यासाठी कोव्हॅक्सिनच्या तिसऱ्या टप्प्यातील क्लिनिकल चाचणीचा डेटा सादर केला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here