कोवॅक्सिन लसीची किंमत जाहीर; मोजावे लागणार तब्बल ‘एवढे’ रुपये

0
47
covaxin
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | अखेर भारत बायोटेकने कोवॅक्सिन लसीची किंमत देखील जाहीर केली आहे. विशेष म्हणजे खासगी रुग्णालयांना ही लस कोविशिल्डपेक्षा दुप्पट किंमतीला घ्यावी लागणार आहे. भारत बायोटेकने शनिवारी रात्री उशिरा यासंदर्भात ट्विटरवर पोस्ट टाकून घोषणा केली आहे.

राज्य सरकारांसाठी कोवॅक्सिनलशी किंमत ही 600 रुपये असणार आहे. तर खासगी हॉस्पिटलमध्ये याच लशीचा दर हा 1200 रुपये असणार आहे. तर परदेशात निर्यात करण्यासाठी  15 ते 20 डॉलर इतका दर राहणार आहे. तर केंद्र सरकारला हीच लस 150 रुपये दरांने दिली जाणार आहे.

भारतात सीरम आणि भारत बायोटेक यांच्याकडून वरील लसींचे उत्पादन घेतले जाते. सीरमने नुकताच आपल्या कोविशील्ड या लसचा दर जाहीर करताना राज्यांसाठी ४०० रुपये प्रतिडोस तर खासगी रुग्णालयांसाठी ६०० रुपये प्रतिडोस असा दर निश्चित केला होता. त्या दरांवरून मोठं वादळ उठलं असताना आता भारत बायोटेकने सीरमपेक्षाही अधिक दर कोव्हॅक्सिनसाठी निश्चित केल्याने नवा वाद उभा राहण्याची शक्यता आहे.

ब्रेकिंग बातम्या सर्वांत अगोदर मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा 9028429273 हा नंबर तुमच्याकडील WhatsApp ग्रुपला Add करा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here