सावधान!!! राज्यात दिवसभरात १६ हजार ६२० करोनाबाधित वाढले ; 50 जणांचा मृत्यू

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्यातकोरोनाचा हाहाकार उडाला असून दिवसभरात तब्बल 16 हजार 620 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. यामध्ये मुंबईतील 1962, पुण्यातील 1740 तर नागपुरातील 2252 नव्या कोरोनाबाधितांचा समावेश आहे. कोरोनाचा वाढता आकडा चिंता वाढवणारं आहे.

दरम्यान, आज ८ हजार ८६१ रुग्ण करोनातून बरे झाले, राज्यात आजपर्यंत एकूण २१,३४,०७२  करोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत.  यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (रिकव्हरी रेट) ९२.२१ टक्के एवढे झाले आहे.

मुंबईतही कोरोना रुग्ण वाढले

मुंबई शहरातही गेल्या काही दिवसांपासून कोरोना रुग्णांच्या संख्येत सातत्याने वाढ होत आहे. मुंबईत आज दिवसभरात तब्बल 1962 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. तर दिवसभरात 1259 रुग्णांनी कोरोनावर मात केली. मुंबईत सध्या 13940 सक्रीय रुग्ण आहेत. मुंबईत दिवसभरात 7 रुग्णांचा मृत्यू झाला. तर आतापर्यंत एकूण 11531 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

राज्यातील सर्व महत्वाच्या ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप Join करा

Click Here to Join Our WhatsApp Group

Leave a Comment