देशात कोरोनाची भीषण परिस्थिती; गेल्या 24 तासांत सापडले तब्बल ३ लाख ४९ हजार ६९१ रुग्ण

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | देशात सुरूच असून रुग्णसंख्येत झपाट्याने वाढ होत आहे. दरम्यान देशात गेल्या २४ तासांत ३ लाख ४९ हजार ६९१ नव्या करोनाबाधितांची भर पडली आहे. त्याचवेळी देशात बरे झालेल्या रुग्णांची संख्या देखील वाढली असून सध्या देशात करोनाचे एकूण २६ लाख ८१ हजार ७५१ अॅक्टिव रुग्ण आहेत.

रविवारी केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून जाहीर करण्यात आलेल्या आकडेवारीनुसार देशभरात २४ तासांत तब्बल २७६७ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे करोनामुळे आत्तापर्यंत भारतात झालेल्या मृतांची संख्या १ लाख ९२ हजार ३११ इतकी झाली आहे.

 

दरम्यान राज्यात देखील कोरोनाचा विस्फोट होत असून राज्यात आता कोरोनाचे 67,160 नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. तर गेल्या 24 तासात 676 जणांना आपला जीव गमवला आहे. आज राज्यात 63,818 जणांनी कोरोनावर मात करुन घरी परतले आहेत. राज्यात आतापर्यंत एकूण 34,68,610 जणांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) 82.02 टक्के झाले आहे.

ब्रेकिंग बातम्या सर्वांत अगोदर मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा 9028429273 हा नंबर तुमच्याकडील WhatsApp ग्रुपला Add करा.