देशात २४ तासात कोरोनाचे ९०५ नवे रुग्ण, संख्या ९ हजारा पुढे

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

वृत्तसंस्था । देशभरात गेल्या चोवीस तासात कोरोनाचे ९०५ रुग्ण आढळले आहेत. या नवीन रुग्णांमुळे देशात कोरोनाबाधितांची संख्या ९ हजार ५२९ वर पोहचली आहे. तर कोरोनाची लागण झाल्याने आत्तापर्यंत देशभरात ३३५ जणांचा मृत्यू झाला आहे. केंद्र सरकारने उपलब्ध करून दिलेल्या www.covid19india.org संकेतस्थळावर ही माहिती दिली आहे.

सध्याच्या घडीला ८ हजार ६० रुग्णांवर उपचार सुरु आहेत. तर १ हजार १४४ जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आज दिवसभरात करोनामुळे ५१ जणांचा मृत्यू झाला आहे. अशीही माहिती आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने दिली आहे. तर राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या ही २ हजार ६४ इतकी झाली आहे. महाराष्ट्र सरकारच्या आरोग्य विभागाने ही माहिती दिली आहे.

महाराष्ट्रात कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण मुंबईत तर देशात सर्वाधिक रुग्ण हे महाराष्ट्रात आहेत. १ हजार ५४९ कोरोनाचे रुग्ण मुंबईत आढळले आहेत. महाराष्ट्रात आतापर्यंत १५० जणांचा मृत्यू कोरोनामुळं झाला आहे. करोनापासून देशाचा बचाव व्हावा यासाठी १४ एप्रिलपर्यंत देशभरात लॉकडाउन पुकारण्यात आला आहे. उद्या या लॉकडाऊनची मुदत संपत आहे. मात्र, दरम्यान, महाराष्ट्र, पश्चिम बंगाल, पंजाब, ओडिशा, तेलंगणा, कर्नाटक, तामिळनाडू या राज्यांनी लॉकडाऊनचा कालावधी वाढवला आहे.महाराष्ट्रात ३० एप्रिलपर्यंत लॉकडाऊन लागू राहणार आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.

हे पण वाचा –

www.hellomaharashtra.in