Covid -19 Vaccine | चार वर्षांपूर्वी जगभरात कोविड-19 नावाचा एक विषाणू आला होता. आणि त्याने जनजीवन विस्कळीत करून ठेवले होते. माणसाच्या आरोग्यावर याचा खोल दुष्परिणाम झाला. ज्या लोकांना कोविड होऊन गेलाय त्यांना देखील आता आजाराचा खूप मोठा धोका निर्माण होतो. त्यांची रोगप्रतिकारशक्ती देखील कमी झालेली आहे.
Covid-19 हा एक संसर्गजन्य आजार आहे. ज्या लोकांना कोविड-19 (Covid -19 Vaccine)झाला होता अशा लोकांना हृदयविकाराचा झटका येण्याची शक्यता मोठ्या प्रमाणात वर्तवली आहे. त्याचप्रमाणे कोविडच्या लसींमुळे देखील हृदयविकाराचा धोका वाढत चालला आहे असे स्पष्ट करण्यात आलेले आहे. कोविड झाल्यानंतर काही दिवसातच जगभरातील सगळ्या लोकांना 2 लस देण्यात आलेल्या होत्या त्यामुळे लोकांना हृदयविकाराचा झटका येत असल्याच्या बातम्या येत आहेत.
अशातच आपले केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडवी यांनी हे सगळे अहवाल फेटाळून लावले आहेत. यावेळी आरोग्य मंत्री म्हणाले की, भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेने सविस्तर अभ्यास केला आहे. ज्यामध्ये हृदयविकाराचा झटका येणाऱ्या कोविड-19 (Covid -19 Vaccinea)कोणताही संबंध दिसून आलेला नाही. हृदयविकाराचा धोका वाढवत देखील नाही आणि झटका देखील आणत नाही. त्यामुळे अशा गोष्टींवर विश्वास ठेवू नका.
एका कार्यक्रमात आरोग्य मंत्री म्हणाले की, आता जगभरात हृदयविकाराच्या झटक्याच्या घटना देखील वाढत चालल्या आहेत. डॉक्टर म्हणतात की, एखाद्या व्यक्तीची अस्वस्थ जीवनशैली आणि अल्कोहोल तसेच धूम्रपान यांसारख्या गोष्टींमुळे देखील त्यांना हृदयविकाराचा झटका येऊ शकतो.
त्यावेळी ते म्हणाले की, कोविड-19 बाबत गैरसमज निर्माण झाला आहे. एखाद्या व्यक्तीला स्ट्रोक आला तरी त्याला असे वाटते की, कोविड-19 लसी मुळे आलेला आहे आयसीएम यावर सविस्तर अभ्यास केला आहे आणि यातून कोणताही परिणाम होत नाही.
कोरोनानंतर हृदयविकाराच्या रुग्णांमध्ये वाढ झाली आहे | Covid -19 Vaccine
कोरोना महामारीनंतर भारतासह जगभरात हृदयविकाराच्या घटनांमध्ये लक्षणीय वाढ झाली आहे. काही अहवालांमध्ये कोविड-19 लसीमुळे असा धोका निर्माण होण्याची भीती व्यक्त करण्यात आली होती, त्याबाबत आरोग्यमंत्र्यांनी स्पष्ट माहिती दिली आहे. ते म्हणाले, पीएम मोदी देखील 60 वर्षांच्या वयोगटात येतात आणि त्यांनी लसीचे तीन डोस घेतले आहेत. कोविड लस सुरक्षित आहेत आणि संसर्ग झाल्यास गंभीर रोगांच्या जोखमीपासून संरक्षण करण्यात मदत करू शकतात.