नवी दिल्ली | देशाभरात कोरोनाचा कहर वाढताना दिसतो आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या आकडेवरीनुसार मागील 24 तासात देशात तब्बल 72,330 नव्या कोरोनाबाधित रुग्नांची भर पडली आहे. ही बाब चिंता वाढवाणारी ठरत आहे. मागील 24 तासात कोरोनातून बरे झालेल्या रुग्नांची संख्या 40,382 इतकी आहे. तर कोरोनामुळे 459 रुग्णांना आपला जीव गमावावा लागला आहे.
नव्याने वाढलेल्या कोरोना रुग्णांमुळे आतापर्यंत कोरोनाबाधितांची संख्या 1,22,21,665 इतकी झाली आहे. तर आतापर्यंत 1,14,74,683 लोक करोनातून बरे झाले आहेत. देशात सध्या कोरोनाच्या 5,84,055 इतके ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. तर आतापर्यंत 1,62,927 रुग्ण कोरोनामुळे दगावले आहेत.
Maharashtra, Chhattisgarh, Karnataka, Punjab, Kerala, Tamil Nadu, Gujarat and Madhya Pradesh continue to show a steep rise in the COVID19 daily new cases. 84.61% of the new cases are reported from these 8 States: Government of India pic.twitter.com/bQowfX7i0I
— ANI (@ANI) April 1, 2021
देशात लसीकरणावर आधीक भर
देशात कोरोना रुग्नांची वाढती संख्या पाहता कोरोना लसीकरणावर देशच्या आरोग्य आरोग्य यंत्रनेकडून आधीक भर दिला जात आहे. लसीकरणाच्या दुसऱ्या टप्प्यात आजपासून 45 वर्षांवरील नागरिकांना लसीकरण केले जात आहे. त्यामुळे लसीकरण केंद्रांवर 45 वर्षे वय असलेल्या व्यक्तींची गर्दी दिसून येत आहे.तसेच राजकीय नेते देखील लसीकरण करून घेताना दिसत आहेत
कोविड -19 च्या साथीवर मात करण्यासाठी वारंवार सोशल डिस्टंसिंग पाळणे, मास्क वापरणे, गर्दी न करणे अशा सूचना प्रशासनाकडून केल्या जात आहेत.
या राज्यात कोरोनाचा वाढता आलेख
देशातील महाराष्ट्र, छत्तीसगड, कर्नाटक, पंजाब, केरळ तामिळनाडू,गुजरात आणि मध्य प्रदेश या राज्यांमध्ये कोरोना वाढीचा आलेख सर्वाधिक उंचावताना दिसत आहे. नव्याने रुग्ण वाढीची आकडेवारी 84.61% इतकी असल्याची माहिती भारतीय आरोग्य विभागाने दिली आहे.
राज्यातील सर्व महत्वाच्या ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी हॅलो महाराष्ट्र सोबत जोडले जा. आम्हाला फॉलोअ करा WhatsApp Group | Facebook Page