हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्यात कोरोना विषाणूने अक्षरशः थैमान घातले असून दररोज झपाट्याने रुग्णसंख्या वाढत आहे. दरम्यान शिक्षणाचे माहेरघर असलेल्या पुण्यात तब्बल 12 हजार 377 रुग्णांची वाढ झाली असून तब्बल 87 रुग्णांना आपला जीव गमवावा लागला आहे. त्यामुळे पुणेकरांच्या चिंतेत भर पडली आहे.
तर राज्यात 24 तासांत 63 हजार 294 नव्या कोरोना रूग्णांची नोंद करण्यात आली आसून 349 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 34 हजार 8 रूग्ण कोरोनाच्या विळख्यातून बाहेर आले आहेत. झपाट्याने वाढत असलेली रूग्णसंख्या पाहाता राज्यात लॉकडाऊनची शक्यता नाकारता येत नाही.
8 दिवसांचा लॉकडाऊन ?? मुख्यमंत्र्यांचे संकेत
मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी आज टास्क फोर्सची बैठकही घेतलीय. या बैठकीत 8 दिवसांचा लॉकडाऊन लावावा, असं मत मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केलंय. तर टास्क फोर्सच्या डॉक्टरांनी किमान 14 दिवसांचा लॉकडाऊन पाहिजे, तर आपण कोरोनाची साखळी तोडू शकते, असं मत मांडलंय. त्यामुळे येत्या एक ते दोन दिवसांत लॉकाडाऊनसंदर्भात निर्णय होण्याची शक्यता आहे.