हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | भारतात हिवाळ्यामध्ये कोरोनाच्या संसर्गाचे प्रमाण वाढू शकते, अशी माहिती केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी दिली आहे. डॉ. हर्षवर्धन म्हणाले, SARS Cov 2 हा एक श्वसनासंबंधीचा विषाणू असून थंडीचा मोसम श्वसनासंबंधीचे आजार वाढवतो. श्वसनासंबंधीच्या विषाणूंची थंडीच्या वातावरणात आणि कमी आद्रतेच्या स्थितीत चांगल्या प्रकारे वाढ होते.
थंडीच्या काळात घरांमध्ये गर्दी वाढते. ही गर्दी संसर्ग वाढण्यास कारणीभूत ठरवू शकते. त्यामुळे या काळात आजारामध्ये वाढ होऊ शकते. यावेळी आरोग्यमंत्र्यांनी युरोपीय देशांच उदाहरण देखील दिला.युरोप मध्ये थंडी सुरु झाल्याने करोनाच्या संसर्गाचे प्रमाणही वाढले आहे. त्यामुळे याबाबत सावधता बाळगण्याचा सल्ला देताना त्यांनी म्हटले की, आम्ही जास्तीत जास्त उपायांवर जोर देत असून त्याचे पालन करणे सोपे आहे. हे करताना घाबरण्याची गरज नाही. मास्क वापरणे आणि फिजिकल डिस्टंसिंग राखणे गरजेचे असून संसर्ग रोखण्यासाठी हा सर्वात चांगला उपाय आहे.
दरम्यान, एनसीडीसीने नुकताच इशारा दिला होता की, हिवाळ्यात दिल्लीत दररोज सुमारे १५,००० करोनाचे रुग्ण समोर येण्याची शक्यता आहे. दिल्लीत हिवाळ्यात श्वसनासंबंधीचे आजार वाढतात. यामुळे मोठ्या प्रमाणावर दिल्लीबाहेरुन रुग्ण इथे येऊ शकतात.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’