सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके
सातारा जिल्ह्यात कोरोना बाधितांचा चढता आलेख आजही तसाच वाढलेला आहे. रविवारी आलेल्या रिपोर्टमध्ये ४०७ जण बाधित तर ४ जणांचा मृत्यू झाला असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक सुभाष चव्हाण यांनी दिली.
जिल्ह्यात मार्च महिन्यात कोरोना बाधितांचे हळूहळू वाढू लागले आहेत. चालू आठवडाभरात १३३,१५९,२९३,३७१, ४९५, ३६५ तर रविवारी आलेल्या रिपोर्टमध्ये ४०७ असा बाधितांचा आकडा वाढतच चाललेला आहे. जिल्ह्यात एकूण कोरोनाबधितांचा ६४५११ आकडा झाला. तर जिल्ह्यात एकूण ५९३०७ बरे झालेली रुग्णसंख्या आहे. आजपर्यंत जिल्ह्यात एकूण १८९७ रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.
सध्या जिल्ह्यात २९०० उपचारार्थ दाखल रुग्ण आहेत. जिल्ह्यात जिल्हाधिकारी तसेच प्रशासनाने लावलेले निर्बंध व त्यावरील कारवाई कोठेच होताना दिसत नाही . त्यामुळे दिवसेंदिवस कोरणा बाधित यांची संख्या वाढत आहे. कोरोना बाधितांची वाढणारी संख्या जिल्ह्यासाठी चिंताजनक आहे.
सातारा जिल्ह्यासह राज्यातील सर्व महत्वाच्या ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप Join करा