औरंगाबाद – शहरात प्रवेश करणाºया सर्व मार्गांवर प्रवाशांची शनिवारपासून अँटीजन तपासणी केली जाणार आहे. तथापि, रविवारी होणाºया एमपीएससीच्या परीक्षेसाठी ५0 टक्क्यांहून अधिक विद्यार्थी बाहेरच्या जिल्ह्यातून येणार असून, त्यांना अँटीजन तपासणील सामोरे जावे लागणार आहे. यापैकी काही जण पॉझिटिव्ह आले, तर त्यांना मात्र परीक्षेला मुकावे लागणार आहे. त्यांना परीक्षा केंद्रापर्यंत नेण्याची कोणतीही सुविधा करण्यात येणार नाही, असे जिल्हा प्रशासनाने म्हटले आहे.
औरंगाबादेत ५९ परीक्षा केंद्रांवर १९ हजार ६५६ विद्यार्थी ही परीक्षा देणार आहेत. रविवारी सकाळ व दुपार अशा दोन सत्रांत ही परीक्षा होणार आहे. रविवारी संपूर्ण दिवस लॉकडाऊन असल्यामुळे विद्यार्थ्यांना पाणी व जेवणाची व्यवस्था स्वत करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. केंद्रावरील नियुक्त कर्मचाºयांच्या कोरोना तपासणीची जबाबदारी आता केंद्र अध्यक्षांवर सोपवली जाणार आहे. तसेच केंद्रांवर पीपीई किटची व्यवस्था केली जाणार आहे.या परीक्षेसाठी ५९ केंद्रांवर विद्यार्थ्यांची व्यवस्था करण्यात आली आहे.
परीक्षा केंद्रात येण्यापूर्वीच प्रवेशद्वारात विद्यार्थ्यांचे तापमान व आॅक्सिजन पातळी मोजली जाणार आहे. काही विद्यार्थ्यांमधये कोरोनाबाबतची थोडीशी जरी लक्षणे आढळून आली तर संशयित विद्यार्थ्यांना परीक्षा देण्यासाठी वेगळी व्यवस्था केली जाणार आहे. गंभीर लक्षणे दिसणाºया विद्यार्थ्यांना पीपीई किट घालून परीक्षा देण्याचीदेखील व्यवस्था करण्यात आली असून, प्रत्येक केंद्रावर पीपीई किट ठेवले जाणार आहे.
औरंगाबाद जिल्ह्यासह राज्यातील सर्व महत्वाच्या ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप Join करा
Click Here to Join Our WhatsApp Group