नवी दिल्ली : देशात कोरोनाबाधितांची वाढणारी संख्या ही डोकेदुखी ठरताना दिसत आहे. कोरोनावर नियंत्रण मिळण्यासाठी एकीकडे लसीकरण आणि दुसरीकडं लॉकडाउन सारखे पर्याय अवलंबले जात आहेत. मात्र रुग्णांची संख्या ही काही आटोक्यात येताना दिसत नाही. मागील 24 तासात देशात नव्याने तब्बल 2 लाख 739 रुग्ण कोरोनाबाधित आढळले आहेत. आतापर्यंतची ही सर्वात मोठी धक्कादायक अशी आकडेवारी आहे. याबाबतची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे. नव्याने वाढलेल्या आकडेवारीमुळे आतापर्यंत देशात एकूण 1कोटी 40 लाख 74 हजार 564 व्यक्ती कोरोना बाधित झालेले आहेत.
देशात मागील 24 तासात 93 हजार 528 रुग्ण करोनातून बरे झालेले आहेत त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. देशातील कोरोनातून बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या 1 कोटी 24 लाख 29 हजार 564 इतकी झाली आहे. तर मागील 24 तासात 1038 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. आतापर्यंत देशात कोरोनामुळे मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या 1 लाख 73 हजार 123 इतकी झाली आहे झाली आहे.
India reports 2,00,739 new #COVID19 cases, 93,528 discharges and 1,038 deaths in the last 24 hours, as per Union Health Ministry
Total cases: 1,40,74,564
Total recoveries: 1,24,29,564
Active cases: 14,71,877
Death toll: 1,73,123Total vaccination: 11,44,93,238 pic.twitter.com/B5quloIUjH
— ANI (@ANI) April 15, 2021
देशात सध्या 14 लाख 71 हजार 870 इतकी कोरोना रुग्णांची ऍक्टिव्ह संख्या आहे. तर देशात आतापर्यंत 11 कोटी 44 लाख 93 हजार 238 जणांना लसीकरण करण्यात आले आहे.वाढत्या कोरोना रुग्णांवर नियंत्रण मिळवण्यासाठी परदेशातून देखील लसी आयात करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. त्यामुळे लसीकरण मोहीम आता अधिक तीव्र करणे गरजेचे असून ते करण्यासाठी सरकार आपली पावलं पुढे टाकत आहे.
राज्यातील सर्व महत्वाच्या ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी हॅलो महाराष्ट्र सोबत जोडले जा. आम्हाला फॉलोअ करा WhatsApp Group | Facebook Page