इंस्टाग्रामवरून ओळख वाढवून तो गेला तरुणीच्या घरी; एकटी असल्याचे कळताच बलात्कार करून झाला पसार

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | सामाजिक माध्यमे जसे फेसबुक, इंस्टाग्राम आणि इतर माध्यमे हे व्यक्तींना एकमेकांना जोडण्यासाठी खूप महत्त्वाची भूमिका बजावतात. पण याच माध्यमांमधून अनेक प्रकारचे गुन्हेही घडत असतात. असाच गुन्हा पुण्यातील कात्रज येथे घडला आहे. इंस्टाग्रामवरून एका तरुणाने एका अल्पवयीन मुलीशी ओळख काढली. आणि ओळख चांगली वाढल्यानंतर ती घरी एकटी असल्यावर घरी जाऊन तिच्यावर बलात्कार केला.

कात्रज येथे राहणाऱ्या अक्षय साबळे नावाच्या व्यक्तीने इंस्टाग्रामच्या माध्यमातून तरुणीशी ओळख केली. दररोज इंस्टाग्रामवर बोलू लागले. एका ठराविक काळानंतर मुलीचा विश्वास त्याने संपादन केला. त्यानंतर एक दिवशी मुलीच्या घरी गेल्यानंतर मुलगी एकटी आहे, असे समजतात त्याने मुलीवर अतिप्रसंग केला. व बलात्कार केल्यानंतर तो तिथून पळून गेला. संध्याकाळी मुलीची आई घरी आल्यानंतर मुलीने आईला घडलेला प्रकार सांगितला. त्यानंतर मुलीच्या आईने जवळच्या पोलीस स्टेशनमध्ये यासंबंधी तक्रार दाखल केली आहे.

सामाजिक माध्यमे जशी माणसं जोडायला अतिशय प्रभावी ठरत आहेत, दुसरीकडे याच सामाजिक माध्यमांमुळे अनेक प्रकारची गुन्हेगारी वाढू लागले आहे. यामध्ये डेटिंग साइट्स तसेच सोशल मीडियावरील अकाउंट यांचाही मोठ्या प्रमाणात समावेश आहे. मागील काही दिवसापूर्वी डेटिंग ॲप वरून ओळख वाढवून एका तरुणीवर बलात्कार केला गेला होता. त्यानंतर डेटींग साईटवरूनच समलैंगिक संबंधांमधील एका व्यक्तीचा खूनही झाला होता. अशा प्रकारचे प्रकरण वारंवार पुण्यामध्ये समोर येत असल्यामुळे सामाजिक माध्यमांच्या वापरावर अनेक प्रश्नचिन्ह निर्माण होत आहेत.

राज्यातील सर्व महत्वाच्या ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी हॅलो महाराष्ट्र सोबत जोडले जा. आम्हाला फॉलोअ करा  WhatsApp Group | Facebook Page

Click Here to Join Our WhatsApp Group

You might also like