नवी दिल्ली । भारतात कोरोना संसर्गाचं प्रमाण धोकादायक टप्प्यावर जाऊन पोहोचलं आहे. दररोज हजारोंच्या संख्येने कोरोना रुग्णांची नोंद होत आहे. दरदिवशी ५० हजार किंवा त्यापेक्षा थोडी जास्तीने वाढणारी ही रुग्णांची संख्या आता ६० हजारांच्या पुढे गेली आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं दिलेल्या माहितीनुसार, मागील २४ तासांत देशात ६२ हजार ५३८ नवीन कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. एकाच दिवसात आढळलेल्या कोरोनाच्या रुग्णांची ही आतापर्यंतची सर्वात मोठी संख्या आहे.
दरम्यान, देशातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्याही २० लाखांच्या पुढे गेली आहे. देशातील एकूण करोनाबाधित रुग्णांची संख्या २० लाख २७ हजार ७५ इतकी झाली आहे. एकमेव दिलासादायक बाब म्हणजे, देशात आतापर्यंत १३ लाखा ७८ हजार १०६ जणांनी करोनावर मात केली आहे. उपचार घेत असलेल्या रुग्णांपेक्षा बरे झालेल्या रुग्णांची संख्या जास्त आहे. देशात सहा लाख ७ हजार ३८४ रुग्णांवर सध्या उपचार सुरु आहेत. तर आतापर्यंत देशात ४१ हजार ५८५ जणांचा बळी गेला आहे.
India's #COVID19 case tally crosses 20-lakh mark with highest single-day spike of 62,538 cases
The COVID19 tally rises to 20,27,075 including 6,07,384 active cases, 13,78,106 cured/discharged/migrated & 41,585 deaths: Ministry of Health pic.twitter.com/AaPCaQW27M
— ANI (@ANI) August 7, 2020
सर्वाधिक कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत भारताचा जगात क्रमांक तिसरा आहे. अमेरिकेत करोना रुग्णांची संख्या ५० लाखांपेक्षा जास्त, ब्राझिलमध्ये २८ लाखांपेक्षा जास्त तर भारतात २० लाखांपेक्षा जास्त झाली आहे. रशियात ८ लाखांपेक्षा जास्त रुग्ण आहेत. तर दक्षिण अफ्रिकेतल्या रुग्णांची संख्या ५ लाखांच्या पुढे आहे. मेक्सिकोमध्ये ४ लाखांच्या पुढे रुग्णसंख्या आहे. पेरुमध्येही ४ लाखांपेक्षा जास्त रुग्ण संख्या आहे. जगातल्या २०० पेक्षा जास्त देशांमध्ये कोरोनाचा प्रसार झाला आहे.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”