Tuesday, February 7, 2023

कोरोना लढ्यात टाटांची एंट्री; फक्त 45 मिनिटांत रिझल्ट देणारं स्वदेशी टेस्ट किट TATA ग्रुपकडून लाँच

- Advertisement -

मुंबई । कोरोनाच्या लढ्यासाठी हजारो कोटी रुपयांची मदत करणाऱ्या टाटा ग्रुपने आता पुन्हा एकदा मोठी कामगिरी बजावलीआहे. टाटा मेडिकल अँड डायग्नोस्टिक Tata Medical and Diagnostics Ltd (TataMD) ने कोरोना चाचणी करण्यासाठी नवीन टेस्ट किट लाँच केले आहे. यामुळे परदेशी टेस्ट किटवरील खर्च वाचणार असून मोठ्या प्रमाणावर कोरोना टेस्ट करण्यास मदत मिळणार आहे.

महत्वाचे म्हणजे टाटाने लाँच केलेले हे टेस्ट किट चिनी टेस्ट किटपेक्षा जास्त परिणामकारक आणि सोपे असल्याचा दावा संशोधकांनी केला आहे. टाटाच्या टेस्ट किटचे नाव ‘TataMD CHECK’ असे ठेवण्यात आले असून CSIR-IGIB (Council of Scientific and Industrial Research-Institute of Genomics and Integrative Biology) सोबत मिळून हे टेस्ट किट बनविण्यात आले आहे.

- Advertisement -

टाटाने तयार केलेले हे कोविड-19 टेस्ट किट्स डिसेंबर महिन्यात देशभरातील लॅबमध्ये उपलब्ध करण्यात येणार आहेत. सीईओ गिरिश कृष्णमूर्ति यांनी ही माहिती दिली आहे. आयसीएमआर आणि डीसीजीआयने या टेस्ट किटला परवानगी दिली आहे. दर महिन्याला 10 लाख किट चेन्नईतील टाटा फॅक्टरीमध्ये बनविण्यात येणार आहेत.

टाटा एमडी चेक हे टेस्टकिट फास्ट रिझल्ट देणारे आहे. इमेज बेसड रिझल्ट तंत्रज्ञान यामध्ये वापरण्यात आले आहे. या किटसाठी स्टँडर्ड लॅबोरेटरी यंत्रणा लागणार असून लॅबोरेटरीमध्ये चाचणी केल्यास 45 ते 50 मिनिटांत पहिला रिझल्ट मिळू शकणार आहे. तर आरएनए एक्सट्रॅक्ट सॅम्पलचा एकूण रिझल्ट मिळण्यास 75 मिनिटे लागणार आहेत. हे किट भारतातच विकसित करण्यात आले आहे. हे किट वापरण्यासाठी स्किल स्टाफचीही गरज लागणार नाही. यामुळे ग्रामीण भाग, दुर्गम भागातही आरोग्य सेवक कोरोना चाचणी करू शकणार आहेत. तसेच या टेस्ट किटसाठी फार मोठी यंत्रेही लागणार नाहीत.

ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा 7972630753 हा संपर्क क्रमांक Hello News या नावाने सेव्ह करा. तुमचे नाव आणि जिल्हा आम्हाला इथे कळवा. ब्रेकिंग बातम्यासाठी लॉगइन : www.hellomaharashtra.in