चिंताजनक! लातूरमधील एकाच वसतीगृहातील ४० विद्यार्थ्यांना कोरोना

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

लातूर । राज्यावर कोरोनाचे (Corona) संकट पुन्हा एकदा ओढावले आहे. कोरोनाबाधित रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. अशा वेळी लातूरमधून एक चिंताजनक बातमी समोर आली आहे. लातूर (Latur) शहरात एकाच वसतीगृहात 40 विद्यार्थ्यांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे.

लातूरमधील एमआयडीसी परिसरातील जेएसपीएम संस्थेच्या वसतीगृहात हा प्रकार घडला आहे. वसतीगृहातील ४० विद्यार्थी कोरोनाबाधित असल्याचे समोर आल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. लातूर महापालिकेने ४२० विद्यार्थ्यांची तपासणी केली होती. या तपासणीचे रिपोर्ट आता समोर आले असून ४० विद्यार्थी कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले आहे.

या सर्व विद्यार्थ्यांना शहरातील १२ नं. पाटी येथील क्वारंटाइन सेंटरमध्ये दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. याशिवाय तपासणी केलेले ३२० विद्यार्थी, १० शिक्षक आणि २० इतर कर्मचारी यांना क्वारंटाईन करण्यात आले आहे

बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’.

 

 

Leave a Comment