सातारा प्रतिनिधी | सकलेन मुलाणी
साताऱ्यातील कोरोनाबधित रुग्णांची संख्या ३३६ झाली आहे. आज, सोमवारी या संख्येत २७ ची भर पडली असून रविवारी ३०९ वर असलेला आकडा आज रात्री १० पर्यंत ३३६ वर स्थिरावला आहे. वाई तालुक्यातील जांभळी गावात मृत्युमुखी पडलेल्या व्यक्तीचा कोरोना अहवाल मृत्यूपश्चात पॉझिटिव्ह आला आहे.
सातारा जिल्ह्यात शनिवारपासून कोरोनाने हाहाकार माजवला आहे. शनिवारी एकाच दिवशी सत्तरहून अधिक रुग्ण पॉझिटिव्ह आढळल्याने जिल्ह्यात तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं. रविवारी या संख्येत आणखी ३१ जणांची भर पडली. जिल्ह्यातील ग्रामीण भागामध्ये रुग्णांची संख्या वाढत असून तीन दिवसांतच १३० हून अधिक बाधित पेशंट आढळल्याने आरोग्य प्रशासनाला अधिक सतर्क व्हावं लागलं आहे.
दरम्यान साताऱ्यातील रुग्णांच्या वाढीमध्ये पुणे आणि मुंबईकर लोकांचं गावाकडे येणं, गावातील लोकांनी सोशल डिस्टनसिंगचं पालन न करणं ही कारणं समोर येत आहेत. दरम्यान येत्या काही ३ दिवसांत सुरुवातीच्या काळात उपचार घेणारे ३० रुग्ण बरे होतील. रुग्णांच्या वाढीवर नियंत्रण ठेवण्यासाठी आरोग्य आणि पोलीस प्रशासनाला आता चांगलीच कंबर कसावी लागणार आहे.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”