Corona Vaccine: ‘कोव्हॅक्सिन’ की ‘कोव्हिशिल्ड’; कोणती लस अधिक प्रभावी? पहा काय सांगते संशोधन…

corona vaccine
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नवी दिल्ली वृत्तसंस्था : कोरोनाची साखळी तोडण्यासाठी देशात सध्या लसीकरणाची मोहीम आणखी तीव्र करण्यात आली आहे. देशात पुण्यातील सिरम इन्स्टिट्यूट बनवलेली कोविडशिल्ड ही लस तसंच भारत बायोटेक या कंपनीने बनवलेली कोवॅक्सिन या दोन्ही लसी दिल्या जात आहेत. या दोन्ही पैकी कोणती लस जास्त प्रभावी आहे ? असा प्रश्न तुम्हाला पडला असेल तर याचे उत्तर आता मिळाला आहे. एका नवीन संशोधनानुसार आता कोवॅक्सिनच्या तुलनेत कॅव्हिडशील्ड ही लस शरीरात अधिक प्रमाणात अँटीबॉडी निर्माण करते. असा निष्कर्ष पुढे आला आहे.कोरोना व्हॅक्सिन इंडक्टेड अँटीबॉडीज टायटर म्हणजेच कोव्हॅट (COVAT) अंतर्गत करण्यात आलेल्या संशोधनात ही माहिती समोर आली आहे.

552 आरोग्य कर्मचाऱ्यांवर संशोधन

या अभ्यासामध्ये कोव्हीडशिल्ड आणि कोवॅक्सिन यापैकी कोणत्याही एका लसीचे दोन डोस घेतलेल्या आरोग्य कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला होता. कोरोनाचा संसर्ग न झालेल्या मात्र दोन्ही डोस घेतलेल्या कर्मचाऱ्यांची या संशोधनासाठी निवड करण्यात आली होती. या अभ्यासात 552 आरोग्य कर्मचारी होते. त्यापैकी 325 पुरुष तर 227 महिला होत्या. 456 जणांनी कॅव्हिडशील्ड तर 96 जणांनी कोवॅक्सिनचा पहिला डोस घेतला होता. लस देण्यात आल्यानंतर एकवीस दिवस तसेच दुसऱ्या डोस सहा महिने पूर्ण होण्याआधी चार वेळा नमुने घेण्यात आले. पहिला डोस नंतर 79.9% पॉझिटिव्हिटी रेट दिसून आला. घेणाऱ्या अँटीबॉडीज 115 टायटर 115 AU/ml तर कोव्हॅक्सिन घेणाऱ्यांमध्ये ते 51 AU/ml होतं, असं या अभ्यासात आढळून आले.

कॅव्हिडशील्ड डोस घेतलेल्या व्यक्तींच्या शरीरामध्ये सेरो पॉझिटिव्हिटी ऑंटी स्पाईक अँटीबॉडीज तयार होण्याचे प्रमाण कोवॅक्सिन घेणाऱ्यांच्या पेक्षा अधिक होते असे या अभ्यासामध्ये दिसून आले आहे. मात्र अद्याप हा अभ्यास अहवाल प्रकाशित झालेला नसून त्यावरील काम सुरू असल्याने सध्या त्याचा वापर क्लिनिकल प्रॅक्टिससाठी करता येणार नाही. सध्या सुरू असणाऱ्या संशोधनानंतर दोन्ही डोस रोगप्रतिकारक शक्तीवर काय परिणाम होतो हे स्पष्ट होणार आहे असे या अहवालात म्हटले आहे. मात्र कॅव्हिडशील्ड आणि कोवॅक्सिन या दोन्ही लसीमुळे चांगल्या प्रकारे प्रतिकारशक्ती निर्माण होत असल्याचे संशोधकांनी नमूद केले आहे ते दोन्ही डोस घेतल्यानंतर शरीरात मोठ्या संख्येने अँटीबॉडीज तयार होतात. मात्र सेरो पॉझिटिव्हिटी रेट कॅव्हिडशील्ड घेतलेल्या मध्ये अधिक असल्याचे दिसून आले आहे. आता सेरो पॉझिटिव्हिटी म्हणजे अँटीबॉडीज शरीरामध्ये असतानाच विषाणूला प्रतिसादात आणि अँटी स्पाईक अँटीबॉडीज निर्माण करण्याची क्षमता होय.