हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Online Dating App : कोरोना महामारीच्या काळात जेव्हा लोकडाऊन सुरु झाले तेव्हा लोकांनी आपला जास्तीत जास्त वेळ घरात घालवला. या काळात इंटरनेटच्या वापरात मोठी वाढ झाली. कारण यावेळी लोकांनी बराच वेळ मोबाईलवर सोशल अॅक्टिव्हिटी आणि मनोरंजनात व्यस्त होते. एका मीडिया रिपोर्टनुसार, यावेळी लोकांकडून डेटिंग एपचा देखील प्रचंड वापर केला. यापैकी बहुतांश युझर्स हे छोट्या शहरांतील होते.
पूर्वी ऑनलाइन डेटिंगची संकल्पना ही फक्त मेट्रो शहरापुरती मर्यादित होती. मात्र आता लहान लहान शहरांतील भारतीय तरुणही प्रेम आणि सहवास मिळविण्यासाठी डेटिंग ऍप्सवर अवलंबून आहेत. आता तर जास्तीत जास्त लोकं अशा पर्सनल डेटिंगसाठी व्हिडिओ कॉल करण्याला प्राधान्य देत आहेत. Online Dating App
मेट्रो शहराबाहेरील युझर्सच्या संख्येत वाढ
एका डेटिंग ऍप कंपनीच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, ऍपमध्ये मेट्रो शहराबाहेरील युझर्सचा वाट आता 70 टक्के झाला आहे. तसेच या युजर्समध्ये महिलांचा वाटाही सर्वाधिक आहे. कारण त्यादेखील डेटिंग प्लॅटफॉर्म वापरत आहेत. हे लक्षात घ्या अहमदाबाद, सूरत, लखनौ, जयपूर, चंदीगड या शहरांमध्ये डेटिंग ऍप्स वापरणाऱ्यांच्या संख्येत कमालीची वाढ झाली आहे. Online Dating App
डेटिंग ऍप्सच्या अधिका-यांनी पुढे सांगितले की, जवळपास 72 टक्के युझर्सना असे वाटते आहे कि, कोणाची प्रत्यक्ष न भेटताही ऑनलाइन जोडीदार शोधणे शक्य आहे. कोविड महामारीनंतर तर भारतीयांना ऑनलाइन डेटिंग प्लॅटफॉर्म आणखी विश्वासार्ह वाटत आहेत आणि ते त्यासाठी पैसे देखील देण्यास तयार आहेत. Online Dating App
अँडवामेट नावाच्या डेटिंग ऍपच्या संस्थापकाने एका रिपोर्टमध्ये सांगितले की, या शहरांमध्ये डेटिंग ऍपच्या युझर्समध्ये झालेल्या वाढीचे कारण मेट्रो शहरातून अनेक तरुणांचे त्यांच्या मूळ गावी स्थलांतरित होणे हे आहे. ते म्हणाले की,” डेटिंग ऍप्स भारतातील लहान शहरांमध्येही अनेक युझर्सना आकर्षित करत आहेत. भारतीय टिंडरवर व्हिडिओ डेटिंगला प्राधान्य देतात. यामध्ये हैदराबाद, चेन्नई आणि बेंगळुरू ही शहरे आघाडीवर आहेत. Online Dating App
अधिक माहितीसाठी ‘या’ वेबसाईटला भेट द्या : https://tinder.com/
हे पण वाचा :
‘या’ फार्मा कंपनीच्या Multibagger Stock ने गेल्या 23 वर्षांत दिला कोट्यवधींचा नफा
Senior Citizen Savings Scheme द्वारे वृद्धांना दरवर्षी मिळतील लाखो रुपये, कसे ते जाणून घ्या
Multibagger Stocks : ‘या’ दोन कंपन्यांकडून आपल्या भागधारकांना मिळणार बोनस शेअर्सची भेट
Gold Price Today : सोन्या-चांदीच्या किंमतीत मोठा बदल, आजची किंमत तपासा
गृहपाठ बंद झाले, आता शिक्षणच बंद करा : अशोकराव थोरात