Credit Card | आज-काल लोक क्रेडिट कार्ड आणि डेबिट कार्डचा वापर सर्रास करतात. अनेक लोक हे जास्त करून क्रेडिट कार्डचा वापर करतात. काही लोकांकडे एक क्रेडिट कार्ड असते, तर काही लोकांकडे एकापेक्षा जास्त क्रेडिट कार्ड असते. वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या क्रेडिट कार्डचा वापर केला जातो. ज्यामुळे त्यांचे रिव्हर्स पॉईंट्स देखील वाढतात. परंतु तुम्ही एका मर्यादित संख्येने स्वतःकडे क्रेडिट कार्ड ठेवू शकता का? आणि याबाबत रिझर्व बँक ऑफ इंडियाचे नक्की काय नियम आहेत? हे आज आपण जाणून घेणार आहोत.
खरंतर क्रेडिट कार्ड वापरण्याबाबत रिझर्व बॅंक बँकेचा कोणत्याही प्रकारचा नियम नाही. तुम्ही तुम्हाला हव्या तितके क्रेडिट कार्ड वापरू शकता. क्रेडिट कार्ड देण्यापूर्वी बँक तुमच्याकडे किती क्रेडिट कार्ड आहे? या सगळ्याचा वापर तुम्ही कशाप्रकारे करता? क्रेडिट कार्डचे बिल वेळेवर भरले जात आहे की नाही? या सगळ्या गोष्टींची तपासणी करते. या सगळ्यात जर तुमची कमाई कमी असेल, तर तुम्हाला क्रेडिट कार्ड मिळणार नाही. पण तुमचे उत्पन्न चांगले असेल तर तुम्हाला अनेक बँका स्वतःहून क्रेडिट कार्ड ऑफर करतात.
तुम्ही एका वेळी आठ किंवा दहा क्रेडिट कार्ड (Credit Card) देखील वापरू शकता. अनेक लोक एकावेळी अनेक बँकांचे क्रेडिट कार्ड वापरतात. त्यामुळे तुम्हाला वेगवेगळ्या कार्डवर वेगवेगळ्या ऑफर देखील मिळतील.. आणि त्याचा फायदा तुम्हाला चांगल्या प्रकारे होईल. या सगळ्याचा विचार करूनच लोक एका पेक्षा जास्त क्रेडिट कार्ड ठेवतात.
त्याचप्रमाणे अनेक लोक बॅलन्स ट्रान्सफर करण्याची सुविधा म्हणजे एका कार्ड वरून दुसऱ्या कार्डवर पेमेंट करण्याची सुविधा देखील ठेवतात. त्यामुळे कधी कधी जास्त क्रेडिट कार्ड ठेवणे देखील हानिकारक असते. जर तुमच्याकडे जास्त क्रेडिट कार्ड असेल, तर तुमचा खर्च देखील जास्त होतो. त्यामुळे तुम्ही अगदी कमीत कमी क्रेडिट कार्ड ठेवा.
त्याचप्रमाणे जर तुमच्याकडे एकापेक्षा अधिक क्रेडिट कार्ड (Credit Card) असेल, तर कोणत्या कामासाठी किती खर्च करायचा आणि त्यासाठी कोणते क्रेडिट कार्ड वापरायचे या सगळ्याचा विचार तुम्ही आधीच करा. जसं सिनेमासाठी वेगळं क्रेडिट कार्ड वापरा, पेट्रोलसाठी वेगळं आणि शॉपिंगसाठी वेगळं, असे वेगवेगळे क्रेडिट कार्ड घेतलं, तर तुम्हाला त्यातून फायदा होईल त्यातून वेगवेगळे रीवार्ड पॉईंट्सदेखील मिळतील.