Cyber Froud : ऑनलाईन फसवणूक झालेल्या लोकांना 24 तासात मिळणार पैसे परत, कसे ते जाणून घ्या

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Cyber Froud : ऑनलाइन फसवणूक करणाऱ्यांचे दिवस आत भरले आहेत. फसवणूक होण्यापासून सामान्य लोकांचे पैसे वाचवण्यासाठी एक सिस्टीम बनवण्यात आली आहे. आणि ही सिस्टीम वापरण्यास अतिशय सोपी आहे. या बातमीमध्ये आम्ही तुम्हाला त्याविषयी सर्व काही सांगणार आहोत. जर तुम्ही ते पूर्णपणे वाचले तर तुम्ही आयुष्यात कधीच ऑनलाइन फसवणुकीला बळी पडणार नाही. आणि जरी बळी पडलात तरी तुमचे सर्व पैसे 24 तासांच्या आत तुमच्या खात्यात परत येतील.

ही सिस्टीम काय आहे ?

भारत सरकारच्या गृह मंत्रालयाने नॅशनल सायबर क्राइम रिपोर्टिंग पोर्टल तयार केले आहे. सोप्या भाषेत सांगायचे झाले तर त्यासाठी एक वेबसाईट तयार करण्यात आली आहे. https://cybercrime.gov.in/Default.aspx  ही लिंक आहे. या वेबसाइटवर एक हेल्पलाईन क्रमांकही देण्यात आला आहे. तो क्रमांक 155260 आहे, तो नोट करा आणि फोनबुकमध्ये सेव्ह करा. Cyber Froud

National Cyber Crime Reporting Portal

दिल्ली, राजस्थान, उत्तराखंड, छत्तीसगड, उत्तर प्रदेश, आसाम, तामिळनाडू आणि आंध्र प्रदेशची लोकं या क्रमांकावर सात दिवस कोणत्याही वेळी (दिवस किंवा रात्री) फोन करून आपल्या तक्रारी नोंदवू शकतात. उर्वरित सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेश, त्यातील रहिवासी सकाळी 10 ते संध्याकाळी 6 दरम्यान फोन करून तक्रार करू शकतात. Cyber Froud

तुम्हाला काय करावे लागेल?

जर तुम्ही कोणत्याही प्रकारच्या ऑनलाइन फसवणुकीला बळी असाल तर तुम्हाला तुमचा फोन उचलून 155260 डायल करावा लागेल. हा नंबर डायल केल्यानंतर तुम्हाला तुमची तक्रार लिहावी लागेल. Cyber Froud

तक्रार करताना ‘या’ गोष्टी लक्षात ठेवा-

फसवणुकीची संपूर्ण माहिती द्या.
फसवणुकीची नेमकी वेळ सांगा.
तुमच्या बँकेचे नाव-पत्ता आणि बँकेचे पूर्ण डिटेल्स किंवा ई-वॉलेट (PhonePe, Google Pay, PatTM etc) ज्याद्वारे पैसे ट्रान्सफर केले गेले आहेत.
तुम्ही दिलेल्या माहितीच्या आधारे कारवाई केली जाईल आणि तुम्हाला तुमचे पैसे लवकरात लवकर मिळतील.

व्हर्चुअल असिस्टंट देखील उपस्थित असेल

व्हर्चुअल असिस्टंट अर्थात कॉम्प्युटराइज्ड असिस्टंट देखील आपल्याला मदत करण्यासाठी या वेबसाइटवर उपस्थित आहे. या असिस्टंटला सायबर दोस्त (Cyber Dost) असे नाव देण्यात आले आहे. याच्या मदतीने तुम्ही तुमची तक्रारही दाखल करू शकता. Cyber Froud

virtual assistant of cybercrime reporting portal

ही सिस्टीम कशी काम करेल?

जेव्हा तुम्ही 155260 वर कॉल करता, तेव्हा हा कॉल सायबर क्राईमच्या कॉल सेंटरपर्यंत पोहोचतो.
आपल्याकडून फसवणुकीची संपूर्ण माहिती घेतल्यानंतर त्याची नोंद केली जाते.
तुम्ही दिलेल्या माहितीच्या आधारे, ज्या बँक खात्यात पैसे पोहोचले असतील, ते खाते सायबर क्राइम सेलद्वारे फ्रिज केले जाईल. याचा अर्थ असा की, ज्या खात्यात तुमचे पैसे गेले आहेत त्याचा मालक ते पैसे काढू शकणार नाही.
जर तुम्ही दिलेली तक्रार योग्य असेल तर तुमच्या खात्यातून काढलेले सर्व पैसे तुमच्या बँक खात्यात परत जमा होतील.
पैसे काढण्याची प्रक्रिया ज्या बँकेत तुमचे पैसे ट्रान्सफर केले गेले आहे त्या बँकेद्वारे केली जाईल.
तर अशा प्रकारे ही संपूर्ण सिस्टीम काम करेल.

Alert cyber fraud account will empty government issued advisory | Cyber  Crime: आपका एकाउंट हैक करने की फिराक में Cyber Fraud, सरकार ने जारी किया  अलर्ट | Patrika News

आता एक प्रश्न असा उद्भवतो की, जर फसवणूकदाराने फसवणूक झाल्यावर लगेच म्हणजेच 5 मिनिटांच्या आतपैसे काढले तर काय होईल?

जेव्हा आम्ही सायबर क्राइमच्या दिल्ली शाखेशी याबद्दल बोललो तेव्हा असे सांगण्यात आले क, या परिस्थितीत तुमची तक्रार तुमच्या भागातील पोलीस स्टेशनला पाठवली जाईल. मग पोलीस इतर प्रकरणांप्रमाणे या प्रकरणातील आरोपींना पकडतील आणि पुढील कारवाई करतील. याचा अर्थ, अशा परिस्थितीत, फसवणुकीचा त्रास अधिक वाढेल. Cyber Froud

जाता जाता ‘या’ कामाचे मुद्दे लक्षात घ्या-

जर तुम्ही सायबर क्राईमला बळी ठरलात तर तत्काळ म्हणजे लगेचच 115260 वर कॉल करा. अजिबात उशीर करू नका.
या प्रकारच्या फसवणुकीला बळी न पडण्याचा प्रयत्न करा. जर कोणी तुम्हाला तुमचे पैसे ट्रान्सफर करण्यास सांगत असेल किंवा तुमच्या बँक खात्याचा तपशील किंवा OTP शेअर करण्यास सांगत असेल तर सावधगिरी बाळगा.
कोणत्याही संशयास्पद कॉलरशी (ज्यांना तुम्हाला फसवणुकीचा संशय आहे) जास्त वेळ बोलू नका.
जर तुमच्या फोनवर एखादी लिंक आली की, तुम्हाला क्लिक करायला सांगितले जाते, तर ती अजिबात उघडू नका.
तर यात काही सावधगिरी बाळगायची आहे, जे तुमच्या मेहनतीचे पैसे वाचवण्यासाठी उपयुक्त ठरू शकतात. Cyber Froud

हे पण वाचा :

Instagram-Facebook ठप्प, युझर्सना मेसेज पाठवण्यात येत आहेत अडचणी !!!

Credit Card चे पूर्ण लिमिट वापरत असाल तर आताच व्हा सावध… अन्यथा होऊ शकेल नुकसान !!!

Business Idea : अत्यंत कमी खर्चात ‘हा’ व्यवसाय सुरू करून मिळवा भरपूर पैसे !!!

Gold Price Today : सोन्याच्या दरात वाढ तर चांदी घसरली, नवीन दर तपासा

LPG Gas Cylinder Price : सर्वसामान्यांना पुन्हा झटका !! घरगुती गॅस सिलिंडरच्या किंमतीत ‘इतकी’ झाली वाढ

Leave a Comment