हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Credit Card) जे लोक मासिक पगारावर घर चालवतात त्यांच्यासाठी भाडे भरणे हा सर्वात मोठा मासिक खर्च असतो. दरम्यान, एखाद्या महिन्यात काही कारणास्तव जास्त सुट्ट्या पडल्या आणि पगार कापला गेला तर मग अशावेळी मोठं संकट उभं राहतं. कारण, कमी पगारामुळे पूर्ण घरगुती बजेट हलतं. परिणामी रकमेअभावी घरभाडे भरणे देखील मुश्किल होते. अशावेळी अनेक लोक क्रेडिट कार्डचा वापर करून घरभाडे भारतात. मात्र, यामुळे तुमच्या सिबिल स्कोअरवर मोठा परिणाम होऊ शकतो. मात्र आपत्कालीन स्थितीत याशिवाय दुसरा पर्याय नसेल तर हे नुकसान कसे टाळता येईल? याविषयी आपण सविस्तर माहिती घेऊया.
घरभाडे भरण्यासाठी क्रेडिट कार्डचा वापर (Credit Card)
जर तुम्हीही घर भाडे भरण्यासाठी क्रेडिट कार्डचा वापर करत असाल तर सर्वप्रथम लक्षात घ्या, जे क्रेडिट कार्डचे बिल नियमितपणे भरतात त्यांच्यासाठी घरभाडे भरण्याची सोय म्हणून त्याचा वापर करणे सोपे आहे. मात्र, शेवटचा उपाय म्हणून जर क्रेडिट कार्डचा वापर करत असाल तर परिस्थिती वेगळी असू शकते होते. कारण जर तुमची शिल्लक वेळेवर फेडण्यासाठी तुमच्याकडे पुरेशी रकम उरली नाही आणि ती वेळेवर भरली गेली नाही तर जास्त व्याज द्यावे लागेल. इतकेच नव्हे तर तुमचा सिबिल स्कोअर खराब होऊ शकतो.
शेवटचा पर्याय क्रेडिट कार्ड असेल तर..
समजा, घरभाडे भरतेवेळी एखाद्या महिन्यात तुमच्याकडे आवश्यक रक्कम नसेल आणि आता क्रेडिट कार्ड वापरण्याशिवाय पर्याय नसेल तर तुम्हाला एक गोष्ट लक्षात ठेवणे गरजेचे आहे. (Credit Card) क्रेडिट कार्डद्वारे भाडे भरल्याने तुम्ही अल्पकालीन आर्थिक संकट टाळाल पण शेवटी तुम्हाला क्रेडिट कार्डचे बिल भरावे लागेल. शिवाय क्रेडिट कार्डच्या थकबाकीवर मिळणारे व्याज खूप जास्त असते. त्यामुळे तुम्ही EMI चा पर्याय निवडलात तर घरभाडे भरल्यानंतर तुम्हाला जास्त व्याज द्यावे लागेल. जे प्रतिवर्षी सुमारे ३० ते ४० टक्के असू शकते.
‘या’ गोष्टी लक्षात ठेवा
1. प्रक्रिया शुल्क – अर्थतज्ञ सांगतात की, तुम्ही क्रेडिट कार्ड वापरून घरभाडे भरणे शक्यतो टाळणे महत्वाचे ठरेल. परंतु काही कारणास्तव आपण क्रेडिट कार्डचा वापर करून घरभाडे भरत असाल तर लक्षात घ्या, तुम्ही तुमच्या क्रेडिट कार्डची देय रक्कम वेळेवर भरण्यात अपयशी ठरल्यास ती किंमत लक्षणीय स्वरूपात वाढू शकते. ती कशी? तर क्रेडिट कार्ड (Credit Card) वापरून भाडे भरण्यासाठी अनेकदा प्रक्रिया शुल्क भरावे लागते. अर्थात तुम्ही तुमच्या भाड्यासाठी मूळ रकमेपेक्षा जास्त पैसे देता.
2. सिबिल स्कोअर – क्रेडिट कार्डचा वापर आपण कुठे आणि कसा करतो याचा परिणाम आपल्या सिबिल स्कोअरवर होत असतो. (Credit Card) दरम्यान, तुमचा CUR अर्थात क्रेडिट युटिलायझेशन रेशो हा क्रेडिट स्कोअरवर परिणाम करणारा महत्त्वाचा घटक आहे. त्यामुळे जर तुम्ही क्रेडिट कार्डचा वापर तुमचे घरभाडे भरण्यासाठी करत असाल तर तुमचा क्रेडिट युटिलिटी रेशो वाढू शकतो आणि याचा तुमच्या सिबिल स्कोअरवर विपरीत परिणाम होण्याची शक्यता असते.
3. व्याजदर वाढेल – क्रेडिट कार्डचा वापर करताना आपल्याला व्याजदर हा घटक देखील लक्षात घ्यावा लागतो. कारण, क्रेडिट कार्डचा वापर केल्यानंतर जर त्याचे बिल वेळेवर भरले गेले नाही, तर तुमचा व्याजदर वाढू शकतो. परिणामी, तुम्हाला प्रक्रिया शुल्काशिवाय अधिक व्याज द्यावे लागेल. (Credit Card)