Credit Card वापरणाऱ्यांनी चुकूनही करू नयेत ‘या’ चुका, अन्यथा होईल मोठे नुकसान

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आजकाल देशात Credit Card संख्येत मोठी वाढ झाली आहे. देशामध्ये मोठ्या शहरांबरोबरच ग्रामीण भागामध्ये देखील क्रेडिट कार्डचा कल वाढला आहे. मात्र क्रेडिट कार्ड हुशारीने वापरल्यास फायदा होतो. त्याबरोबर क्रेडिट कार्डचा वापर बेजबाबदारीने केल्यास आपण कर्जाच्या जाळ्यात अडकू शकतो. क्रेडिट कार्ड प्रभावीपणे वापरण्यासाठी कोणत्या गोष्टी टाळल्या पाहिजेत हे जाणून घेउयात…

Card Insider guides beginners the right way to use a credit card! –  ThePrint –

1. फक्त मिनिमम अमाउंट ड्यू भरणे

जेव्हा कार्डधारक फक्त मिनिमम अमाउंट ड्यू भरतात, तेव्हा त्यांना लेट फीस भरण्याची आवश्यकता नसते. मिनिमम अमाउंट ड्यू हे पेमेंट युझर्सच्या थकबाकीच्या बिलाचा एक छोटा अंश (सामान्यतः 5 टक्के) आहे. मात्र, यामुळे तुमचे कर्ज जलद वाढू शकते कारण दररोज न भरलेल्या रकमेवर फायनान्स चार्ज आकारले जाते. क्रेडिट कार्डवरील फायनान्स चार्ज साधारणपणे 40 टक्क्यांहून जास्त वार्षिक असते. Credit Card

Credit Card Applying Process | Steps to acquire a credit card | | Need to  Know best time to apply and more

2. ATM मधून पैसे काढणे

क्रेडिट कार्डद्वारे ATM मधून पैसे काढणे टाळले पाहिजे. वास्तविक, Credit Card मधून कॅश काढण्यासाठी क्रेडिट कालावधी उपलब्ध नाही. तुमच्या कार्डवर आकारले जाणारे व्याजदर तुम्ही ATM मधून पैसे काढता त्या दिवसापासून सुरू होते.

3. व्याजमुक्त कालावधीनुसार नियोजन नाही

व्याजमुक्त कालावधी सहसा 18-55 दिवस असतो. या कालावधीत क्रेडिट कार्ड ट्रान्सझॅक्शनवर कोणतेही शुल्क आकारले जात नाही जोपर्यंत तुम्ही वेळेवर थकबाकी भरली नाही. जास्तीत जास्त लाभासाठी तुम्ही तुमच्या खरेदीचे इंटरेस्ट फ्री कालावधीनुसार नियोजन करावे. तुम्ही तुमच्या बिलिंग सायकलच्या सुरुवातीलाच मोठ्या खरेदी कराव्यात. या परिस्थितीत तुम्हाला रक्कम परत करण्यासाठी जास्त इंटरेस्ट फ्री दिवस मिळू शकतात. Credit Card

12 Best Credit Cards For Fresh Grads To Build Credit Score In Malaysia

4. क्रेडिट कार्डची पूर्ण मर्यादा वापरणे

क्रेडिट कार्डची संपूर्ण मर्यादा वापरणे कधीही टाळा. यामुळे तुमच्या क्रेडिट स्कोअरवर परिणाम होईल. साधारणपणे, क्रेडिट कार्ड कंपन्या क्रेडिट युटिलायझेशन रेशो 40 टक्क्यांपेक्षा जास्त हे कर्जाचे लक्षण मानतात. वास्तविक, क्रेडिट युटिलायझेशन रेशो (CUR) चा क्रेडिट स्कोअरवर मोठा प्रभाव पडतो. तुम्ही तुमचे क्रेडिट कार्ड किती वापरता यावर तुमचे क्रेडिट युटिलायझेशन रेशो अवलंबून असते. Credit Card

अधिक माहितीसाठी या वेबसाईटला भेट द्या : https://www.bankbazaar.com/credit-card.html

हे पण वाचा : 

Credit Card युझर्सना आता UPI द्वारेही पेमेंट करता येणार !!!

Gold Price Today : सोन्यामध्ये तेजी तर चांदीही वधारली, आजचे दर जाणून घ्या

Bank Strike : 27 जून रोजी बँक कर्मचारी पुकारणार संप, सलग 3 दिवस बँका राहणार बंद

Ration Card मध्ये घरातील नवीन सदस्याचे नाव नोंदवण्याची प्रक्रिया जाणून घ्या

नवीन M2 चिप सहित येणार MacBook Pro आणि MacBook Air, फीचर्स जाणून घ्या

Leave a Comment