हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सध्याच्या काळात Credit Card वापरणाऱ्यांच्या संख्येत मोठी वाढ झाल्याचे दिसून येते आहे. देशामध्ये मोठ्या शहरांबरोबरच ग्रामीण भागामध्ये देखील क्रेडिट कार्डचा कल चांगलाच वाढला आहे. मात्र क्रेडिट कार्डचा वापर जसजसा वाढत आहे तसतसा त्यामध्ये चूक होण्याची शक्यताही वाढत आहे. मात्र हुशारीने वापर केल्यास क्रेडिट कार्डचा चांगला फायदा देखील होतो. मात्र जर त्याचा वापर बेजबाबदारीने वापर केला ते आपल्याला कर्जाच्या जाळ्यात अडकवू शकते. चला तर मग आज आपण क्रेडिट कार्ड प्रभावीपणे वापरण्यासाठी कोणत्या गोष्टी टाळल्या हे जाणून घेउयात…
एटीएममधून पैसे काढणे
जर आपण क्रेडिट कार्ड वापरत असाल तर याद्वारे एटीएममधून पैसे काढणे टाळावे. वास्तविक, Credit Card मधून कॅश काढण्यासाठी क्रेडिट कालावधी उपलब्ध नाही. मात्र यावरील व्याजदर हे ATM मधून पैसे काढता त्या दिवसापासून सुरू होते.
संपूर्ण क्रेडिट मर्यादेचा वापर
जर आपण Credit Card वापरत असाल तर क्रेडिट कार्डची पूर्ण मर्यादा वापरणे टाळा. कारण हे आपल्या क्रेडिट स्कोअरवर परिणाम करू शकेल. साधारणपणे, क्रेडिट कार्ड कंपन्या 30 टक्क्यांपेक्षा जास्त क्रेडिट युटिलायझेशन रेशो हे कर्जाचे लक्षण मानतात. वास्तविक, क्रेडिट युटिलायझेशन रेशो (CUR) चा क्रेडिट स्कोअरवर मोठा प्रभाव पडतो. त्याचप्रमाणे आपण क्रेडिट कार्ड किती वापरतो यावर देखील क्रेडिट युटिलायझेशन रेशो अवलंबून असते.
फक्त मिनिमम अमाउंट ड्यू भरणे
जेव्हा कार्डधारक फक्त मिनिमम अमाउंट ड्यू भरतो, तेव्हा त्यांना लेट फीस भरण्याची आवश्यकता नसते. मिनिमम अमाउंट ड्यू हे पेमेंट युझर्सच्या थकबाकीच्या बिलाचा एक छोटा अंश (सामान्यतः 5 टक्के) आहे. मात्र, यामुळे आपले कर्ज वाढू शकते. कारण यामध्ये दररोज न भरलेल्या रकमेवर फायनान्स चार्ज आकारला जातो. क्रेडिट कार्डवरील फायनान्स चार्ज साधारणपणे 40 टक्क्यांहून जास्त वार्षिक असते. Credit Card
अधिक माहितीसाठी या वेबसाईटला भेट द्या : https://www.sbicard.com/
हे पण वाचा :
LIC ने लाँच केला जबरदस्त इन्शुरन्स प्लॅन, 15 दिवसांत विकल्या 50,000 पॉलिसी
PNB : आता ‘या’ सरकारी बँकेने ग्राहकांना दिला धक्का, कर्जावरील व्याजदरात केली वाढ
Aadhaar Card मधील चुकीची माहिती अशा प्रकारे घरबसल्या करा अपडेट
Axis Bank च्या ग्राहकांसाठी आनंदाची बातमी, FD वरील व्याजदरात झाली वाढ
Bank of Baroda कडून ग्राहकांना धक्का !!! आता बँकेकडून कर्ज घेणे महागले