मोठी दुर्घटना ! ऑस्ट्रेलियाची टीम मैदानात येताच स्टँड कोसळले

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मुंबई : हॅलो महाराष्ट्र – श्रीलंका आणि ऑस्ट्रेलिया (Australia) यांच्यात गॉलमध्ये पहिली टेस्ट सुरू आहे. या टेस्टच्या पहिल्या दिवशी व्यवस्थित खेळ झाला. पण, दुसऱ्या दिवशी खेळ सुरू होण्यापूर्वी पाऊस आणि वादळानं अडथळा निर्माण केला. पावसामुळे दुसऱ्या दिवसाचा खेळ वेळेत सुरू झाला नाही. त्याचबरोबर एक स्टँड देखील कोसळून पडले. ऑस्ट्रेलियन (Australia) टीम मैदानात दाखल होताच काही वेळानं झालेल्या या घटनेने सर्वांना धक्का बसला आहे. सुदैवाची बाब म्हणजे हा अपघात झाला त्यावेळी तिथं कोणताही प्रेक्षक नव्हता. त्यामुळे या अपघातामध्ये कुणीही जखमी झाले नाही.

दुसऱ्या दिवशी खेळ सुरू होण्यापूर्वी जवळपास 90 मिनिटे मुसळधार पाऊस झाला. यावेळी वारा देखील वेगानं सुटला होता. त्यामुळे हे स्टँड कोसळले. पावसामुळे ग्राऊंड स्टाफनं सर्व पिच झाकलं, पण मैदानातील काही भागात दोरीनं कव्हर अंथरण्यात आले होते. ते कव्हर वाऱ्यानं उडाले. पाऊस आणि वादळामध्ये संपूर्ण मैदान झाकण्यासाठी ग्राऊंड स्टाफला चांगलाच संघर्ष करावा लागला.

गॉल टेस्टच्या पहिल्या दिवशी 13 विकेट्स पडल्या आहेत. त्यामुळे ही टेस्ट निकाली लागण्याची पूर्ण शक्यता आहे. यजनान श्रीलंकेची पहिली इनिंग 212 रनवर संपुष्टात आली. निशान डिकवेलानं सातव्या नंबरवर बॅटींगला येत झुंजार 58 रनची खेळी केली. एंजलो मॅथ्यूजनं 39 रन काढले. ऑस्ट्रेलियाकडून (Australia) ऑफ स्पिनर नॅथन लायन यांनी 90 रन देत 5 विकेट्स घेतल्या. तर मिचेल स्वेपसननंही 3 विकेट्स घेतल्या. पॅट कमिन्स आणि मिचेल स्टार्कला प्रत्येकी एक विकेट मिळाली.

हे पण वाचा :
शिवसैनिक आक्रमक!! श्रीकांत शिंदे यांचे कार्यालय फोडले

आम्ही शिवसेनेचेच सदस्य, काँग्रेस- राष्ट्रवादीनेच सेनेला हायजॅक केलं

हिंमत असेल तर स्वतःच्या बापाच्या नावाने मतं मागा; मुख्यमंत्र्यांचा शिंदेवर हल्लाबोल

साताऱ्यात आ. शंभूराज देसाई यांच्या विरोधात आंदोलन

मुंबईत 10 जुलै पर्यंत जमावबंदी लागू

Leave a Comment