हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । ऑस्ट्रेलियामधील स्पिन गोलंदाजीच्या सद्यस्थितीबद्दल महान फिरकी गोलंदाज शेन वॉर्नला चिंता वाटत आहे. शेन वॉर्नचा असा विश्वास आहे की,” ऑस्ट्रेलियातील फिरकी गोलंदाजी सुधारण्यासाठी क्रिकेट ऑस्ट्रेलियाला प्रत्येक प्रथम श्रेणी सामन्यात एक फिरकी गोलंदाज टीममध्ये असणे बंधनकारक केले पाहिजे. शेन वॉर्नने ‘द वेस्ट ऑस्ट्रेलियन’शी बोलताना सांगितले की, ” फिरकी गोलंदाजाने प्रत्येक सामना खेळला पाहिजे, मग परिस्थिती कशीही असो. जेणेकरून पहिल्या किंवा चौथ्या दिवशी गोलंदाजी कशी करावी हे त्या फिरकीपटूला कळेल. स्थानिक संघ परिस्थिती अनुकूल असते तेव्हाच त्यांची निवड करतात. ”
वॉर्न म्हणाला, “जर ते देशांतर्गत पातळीवर खेळले नाहीत तर ते कसे शिकतील. राज्य संघांकडे प्रत्येक सामन्यात एक तरी स्पेशल फिरकी गोलंदाज असला पाहिजे. क्रिकेट ऑस्ट्रेलियाला यासाठी अथक प्रयत्न करावे लागतील. “
वॉर्न पुढे म्हणाला की,” नॅथन लिऑनची जागा घेण्यासाठी ऑस्ट्रेलियामध्ये प्रतिभावान फिरकीपटूंचा अभाव आहे. तो म्हणाला की,” ड्रॉप इन खेळपट्ट्यांमुळे फिरकीपटूंचा विकास होत नाही आहे. “एकेकाळी प्रत्येक राज्यात परिस्थिती वेगळी होती, परंतु आता सर्वत्र कृत्रिम खेळपट्ट्यांचा वापर केला जात आहे. आपण त्यांचा जास्त प्रमाणात वापर करणे टाळले पाहिजे. “
तो म्हणाला, “नॅथन लिऑन हा जगातील एक उत्कृष्ट फिरकीपटू आहे आणि यामुळे आम्ही खूप भाग्यवान आहोत. जर त्याला काही झाले तर आमच्याकडे असा फिरकी गोलंदाज असेल ज्याला प्रथम श्रेणी क्रिकेटचा कमी अनुभव असेल, ज्याला जगातील काही सर्वोत्कृष्ट फिरकीपटुंना सामोरे जावे लागेल. “
वॉर्नने इशारा देत सांगितले की, “आमच्याकडे ऑस्ट्रेलियामध्ये काही चांगले फिरकीपटू आहेत, परंतु त्यांना संधी मिळत नाही. क्रिकेट ऑस्ट्रेलियाने राज्यांवर थोडा दबाव आणला पाहिजे आणि त्यांना सांगितले पाहिजे की,प्रत्येक सामन्यात आपल्या संघात एका फिरकीपटूची निवड करावी लागेल.”
५० वर्षीय वॉर्नचा असा विश्वास आहे की ड्रॉप-इन पिचेसच्या वाढत्या वापरामुळे अशीच परिस्थिती कायम राहिली तर चांगल्या स्पिनर्सच्या खेळावर परिणाम होईल. तो म्हणाला, “एक काळ असा होता की, प्रत्येक राज्यात पूर्णपणे भिन्न परिस्थिती होती. आता तेथे बरेच ड्रॉप-इन पिचेस आहेत अॅडलेड, मेलबर्न, पर्थ येथील नवीन स्टेडियमवर ड्रॉप-इन खेळपट्टी आहे. आपल्याला त्याबद्दल सावधगिरी बाळगली पाहिजे.”
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.