आयपीएलमधली सगळ्यात खतरनाक टीम कोणती? ; आकाश चोप्राने घेतलं ‘या’ बलाढ्य संघाचं नाव

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | जगातील सर्वात मोठी क्रिकेट स्पर्धा असलेल्या आयपीएल 2021ला आता फक्त काही दिवस शिल्लक असून चाहत्यांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. आत्तापासूनच आयपीएल विषयी जोरदार चर्चा रंगत आहेत. दरम्यान, समालोचक आकाश चोप्राला आयपीएलमधली सगळ्यात खतरनाक टीम कोणती?, असा प्रश्न विचारला असता त्याने मुंबई इंडियन्स ही आयपीएलमधली सगळ्यात खतरनाक टीम असल्याचं सांगितलं.

एका युट्यूब फॅन्सच्या प्रश्नाला उत्तर देताना आकाश चोप्राने मुंबई इंडियन्स ही या मोसमातील सगळ्यात विस्फोटक आणि करंडकाची प्रबळ दावेदार असलेली टीम सांगितली. मुंबईजवळ रोहित शर्मा, क्विंटन डिकॉक, इशान किशन, सूर्या, पांड्या ब्रदर्स असे एकाहून एक विस्फोटक फलंदाज आहेत. त्यामुळे मुंबईला रोखणं प्रतिस्पर्धी संघासाठी अवघड जाणार आहे, असं आकाश चोप्रा म्हणाला.

इशान किशान, सुर्यकुमार यादव, हार्दिक पांड्या, क्रुणाल पांड्या असे एकाहून एक सरस फलंदाज मुंबईच्या संघात आहे. त्यामुळे यंदाच्या मोसमात मुंबई धावांचा डोंगर रचेल. हा डोंगर पोखरु न देण्याचं काम मुंबईचे गोलंदाज करतील आणि मुंबईच्या गोलंदाजीचा भार सांभाळेल जगातील सर्वांत खतरनाक गोलंदाज यॉर्कर किंग जसप्रीत बुमराह… एका संघाला जिंकण्यासाठी दुसरं काय हवं असतं, असंही आकाश चोप्रा म्हणाला.

दरम्यान मुंबई इंडिअन्स हा आयपीएल मधील सर्वात यशस्वी संघ असून कर्णधार रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली मुंबईने आत्तापर्यंत तब्बल 5 वेळा आयपीएल चषक आपल्या नावावर केला आहे. रोहित शर्माचे कल्पक नेतृत्व, आक्रमक फलंदाज आणि टिच्चून गोलंदाजी करणारे अनुभवी गोलंदाज ही मुंबईची मुख्य ताकद आहे.

राज्यातील सर्व महत्वाच्या ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी हॅलो महाराष्ट्र सोबत जोडले जा. आम्हाला फॉलोअ करा  WhatsApp Group | Facebook Page

Click Here to Join Our WhatsApp Group

Leave a Comment