मुंबई : हॅलो महाराष्ट्र – इंग्लंडनं लॉर्ड्सवर झालेल्या पहिल्या टेस्टमध्ये न्यूझीलंडचा 5 गडी राखून पराभव केला आहे. जो रूटने (Joe Root) कर्णधारपद सोडल्यानंतर त्याची हि पहिलीच टेस्ट होती. या टेस्टमध्ये रूटनं (Joe Root) नाबाद 115 रन केले. त्याच्या शतकामुळे इंग्लंडनं 277 रनचं लक्ष्य चौथ्या दिवशीच पूर्ण केले. या विजयासह यजमान टीमनं 3 टेस्टच्या मालिकेत 1-0 नं आघाडी मिळवली आहे. लॉर्ड्स टेस्टमधील रूटच्या (Joe Root) कामगिरीनं ऑस्ट्रेलियाचा माजी कॅप्टन मार्क टेलर चांगलाच प्रभावित झाला. त्यानंतर त्याने रूट महान क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरचा टेस्ट क्रिकेटमधील रेकॉर्ड तोडू शकतो, असा दावा केला आहे.
काय म्हणाले मार्क टेलर ?
‘जो रूट (Joe Root) आणखी किमान 5 वर्ष नक्की खेळेल. त्यामुळे सचिनचा टेस्ट रेकॉर्ड त्याच्या आवाक्यात आहे, असं मला वाटतं. तो सचिनचा रेकॉर्ड तोडू शकतो. रूट गेल्या 2 वर्षांपासून जबरदस्त बॅटींग करत आहे. तो सध्या त्याच्या कारकिर्दीच्या शिखरावर आहे. तो फिट राहिला तर 15 हजारांपेक्षा जास्त रन करू शकतो.’ असा दावा टेलरनं केला आहे.
लॉर्ड्स टेस्टच्या चौथ्या इनिंगमध्ये रूट बॅटींगला आला त्यावेळी इंग्लंडची अवस्था 2 आऊट 32 होती. त्यानंतर रूटनं (Joe Root) नवा कॅप्टन बेन स्टोक्ससोबत 90 रनची भागिदारी केली आणि संघाला सावरले. बेन स्टोक्स 54 रन काढून आऊट झाला. त्यानंतर रूटनं विकेट किपर-बॅटर बेन फॉक्ससोबत 120 रनची भागिदारी करत इंग्लंडच्या विजयावर शिक्कामोर्तब केले. या टेस्टमध्ये रूटने शतकासह 10 हजार रनचा टप्पा देखील ओलांडला.
सचिन तेंडुलकरचा टेस्टमधील रेकॉड
टेस्ट क्रिकेटमध्ये सर्वात जास्त रन करण्याचा रेकॉर्ड सचिन तेंडुलकरच्या नावावर आहे. सचिननं त्याच्या कारकिर्दीमध्ये 15921 रन केले. त्यानं टेस्टमध्ये 51 शतक झळकावले आहेत. रूट अद्याप सचिनच्या जवळपास 6 हजार रन मागे आहे. त्याने नुकताच टेस्ट क्रिकेटमध्ये 10 हजार रनांचा टप्पा पार केला आहे. टेस्ट क्रिकेटमध्ये 10 हजारपेक्षा जास्त रन करणारा तो क्रिकेट विश्वातील 14 वा तर इंग्लंडचा दुसरा खेळाडू ठरला आहे.
हे पण वाचा :
भंडाऱ्यात बर्निंग ट्रकचा थरार, भयानक कारण आले समोर
रस्त्यावरील वळण न दिसल्याने मोटरसायकलचा अपघात; 3 ठार 1 जखमी
दुर्दैवी ! इंद्रायणी नदीत पाण्यात बुडून माय-लेकांचा मृत्यू
अनवाणी पायाने आगीवर धावताना दिसली मुले, धक्कादायक Video आला समोर
वाढत्या कोरोनामुळे शाळा बंद राहणार कि सुरु ?; शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांचे मोठे विधान