अनवाणी पायाने आगीवर धावताना दिसली मुले, धक्कादायक Video आला समोर

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – सोशल मीडियावर दररोज नवनवीन व्हिडिओ (Video) व्हायरल होत असतात. यामध्ये व्हिडिओ (Video) मजेशीर असतात तर काही व्हिडिओ भयंकर असतात. सध्या सोशल मीडियावर असाच एक व्हिडिओ (Video) व्हायरल होत आहे तो पाहून तुम्हाला भीतीही वाटेल आणि तुम्ही हैराणही व्हाल. देशभरातील वेगवेगळ्या भागांमध्ये अनेक निरनिराळ्या प्रथा आणि परंपरा आहेत. याचं पालन त्या भागातील लोक अगदी श्रद्धेने करत असतात. मात्र, काही परंपरा इतक्यात भयानक असतात की ते पाहाणाऱ्यांचाही थरकाप उडतो.

सध्या व्हायरल होणाऱ्या व्हिडिओमध्ये (Video) काही मुलं जळणाऱ्या लाकडांवरुन धावताना दिसत आहेत. हा व्हायरल व्हिडिओ बलियाच्या बलथ्रारोड येथील आहे. या व्हिडिओ स्पष्टपणे दिसतं, की लहान मुलं आगीवर पळत आहेत. शेजारीच उभा असलेला एक व्यक्ती या मुलांना या आगीवर ढकलत आहे. व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की याठिकाणी भरपूर गर्दी आहे आणि चारही बाजूंनी एक घेर बनवला गेला आह आहे. याच्याभोवती धावून काही युवक आगीजवळ येतात. यानंतर ते जळणाऱ्या लाकडांवरुन अनवाणी धावू लागतात.

या व्हिडिओमध्ये (Video) दिसत आहे कि, सुरुवातीला काही तरुण आगीवरुन धावतात आणि नंतर लहान मुलं अनवाणी आगीवरुन धावू लागतात. या व्हिडिओमध्ये दिसणारं हे दृश्य अतिशय भयानक आणि थरकाप उडवणारं आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर सध्या जोरदार व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ पाहून तुमचा थरकाप उडाल्याशिवाय राहणार नाही.

हे पण वाचा :
अशा प्रकारे गुंतवणूक करून 15 वर्षांत मिळवा 1.2 कोटी रुपये !!!

कोरोनाचं प्रमाण वाढतंय योग्य खबरदारी घ्या; केंद्र सरकारचे महाराष्ट्र सरकारला पत्र

मुलाशी नाही तर स्वतःशीच लग्न करणार गुजरातची ‘ही’ मुलगी !!!

मी सत्तेसाठी नाही तर सत्यासाठी लढणार; गोपीनाथ गडावरून पंकजा मुडेंचे सूचक विधान

आता खरी वेळ सुरु झाली आहे ; अर्ज मागे घेण्याची वेळ संपताच संजय राऊतांचा भाजपला इशारा

Leave a Comment